Tech Layoffs 2024 eSakal
विज्ञान-तंत्र

Tech Layoffs : नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही 'टेक लेऑफ'चा ट्रेंड सुरूच; फेब्रुवारी अखेरपर्यंत सुमारे 50 हजार कर्मचारी घरी

Layoffs in February : जानेवारी महिन्यात जगभरातील 121 कंपन्यांमधील 34,007 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. यानंतर फेब्रुवारी महिन्यात 74 कंपन्यांनी 15,379 कर्मचाऱ्यांना कमी केलं.

Sudesh

Tech Companies Layoff in 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच टेक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात पहायला मिळत आहे. खरंतर कोरोना काळानंतरच कित्येक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपात सुरू केली होती. हाच ट्रेंड यावर्षीदेखील सुरू आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जगभरातील 186 टेक कंपन्यांनी सुमारे 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं असल्याचं समोर आलं आहे. (Tech News)

जानेवारी महिन्यात जगभरातील 121 कंपन्यांमधील 34,007 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. यानंतर फेब्रुवारी महिन्यात 74 कंपन्यांनी 15,379 कर्मचाऱ्यांना कमी केलं. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीची आकडेवारी निम्मी असली, तरी कित्येक कंपन्यांनी यावर्षी आपण आणखी लेऑफ करणार असल्याचे संकेत आतापासूनच दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (February Layoffs)

मार्क झुकरबर्गने केलं समर्थन

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg on Layoff) यांनी कर्मचारी कपातीचं समर्थन केलं आहे. कंपनी पुढे नेण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, असं ते एका मुलाखतीत म्हणाले. कित्येक कंपन्या अजूनही कोविडमधून सावरत आहेत, असंही ते म्हणाले होते. लेऑफसाठी विविध गोष्टी कारणीभूत असून, केवळ एआयला दोष देणं बरोबर नाही असंही ते म्हणाले होते.

काय आहेत कारणं?

रिस्ट्रक्चरिंग

एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यामागे कित्येक कारणं आहेत. अमेरिका आणि जगभरातील कित्येक कंपन्या सध्या रिस्ट्रक्चरिंगवर भर देत आहेत. यामुळे कित्येक पोझिशन गायब केल्या जात आहेत. यासोबतच, कॉस्ट कटिंग हेदेखील एक प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. (Tech Layoff reasons)

रिसेशनची भीती

सध्या जगभरातील मार्केट हे अगदी अनिश्चित स्वरुपात आहे. जपानमध्ये आर्थिक मंदी आलेलं स्पष्ट झालंय, तर अमेरिका आणि इतर मोठ्या देशांवर देखील मंदीचं (Recession) सावट आहे. त्यातच हे वर्ष निवडणुकांचं (Elections) असल्यामुळे, सरकार बदललं जाऊन त्याचा परिणाम मार्केटवर होण्याची शक्यता आहे. यामुळे कित्येक कंपन्या सध्या 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहेत. कंपन्यांनी लेऑफ सुरू केलं आहेच, मात्र हायरिंग देखील थांबवलं आहे.

ओव्हरस्टाफिंग

मार्क झुकरबर्गने आपल्या मुलाखतीत हा मुद्दा सांगितला होता. कोरोना काळात सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे टेक कंपन्यांनी भरमसाठ हायरिंग केलं होतं. आता जग हळू-हळू पूर्ववत होत असताना लोक पुन्हा ऑफलाईन पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे कोरोना काळात जादा भरलेल्या लोकांना कामावरुन कमी केलं जात आहे.

एआय

गेल्या दोन वर्षांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट्स आणि जनरेटिव्ह टूल्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यातील कित्येक टूल्स हे एकाच वेळी दहा-दहा लोकांचं काम करण्यासही समर्थ आहेत. यामुळे देखील कित्येक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Team India: करुण नायरसाठी कसोटी संघाचे दरवाजे होणार बंद? श्रेयस अय्यरबाबत 'तो' निर्णय घेत BCCI ने दिले मोठे संकेत

विसर्जन मिरवणुकीत कलाकारांना थारा नाही? DJ च्या धुमाकुळामुळे कलावंत पथकाचं वादन रद्द, चाहत्यांचा हिरमोड

Latest Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यात

Satej Patil and Malojiraje : सतेज पाटील, मालोजीराजे भाजपच्या स्वागत कक्षात, राजेश क्षीरसागरांना पाहून सतेज पाटील हात पुढे करत म्हणाले, काळजी घ्या...

SCROLL FOR NEXT