Layoff Sakal
विज्ञान-तंत्र

Tech layoffs 2022: नक्की चाललय काय? Amazon, Twitter नंतर आणखी एका टेक कंपनीने दिला ४ हजार जणांना नारळ

गेल्या महिनाभरात Meta, Amazon आणि Twitter ने हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता Cisco ने जवळपास ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

Akash Ubhe

Tech layoffs in 2022: गेल्या काही दिवसात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या टेक कंपन्या असलेल्या Meta, Amazon आणि Twitter चा समावेश आहे. या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता या यादीमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला असून, आयटी-नेटवर्किंग कंपनी असलेल्या Cisco ने ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Cisco कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर कंपनीने एकूण ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. यानुसार, जवळपास ४ हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. ठराविक कामात संतुलन निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

या कपातीवर कंपनीकडून थेट कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु, कंपनीने अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, हा निर्णय सहज घेण्यात आलेला नाही. या निर्णयाचा फटका ज्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे, त्यांना आर्थिक मदत केली जाईल. रिपोर्टनुसार Cisco चे सीईओ आणि चेअरमन Chuck Robbins याबाबत बोलताना म्हणाले की, विशिष्ट कामासाठी कर्मचारी कपात करून संतुलन निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

या कपातीनंतर आता कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधण्यास देखील सुरुवात केली आहे. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून भरपाई मागण्यास देखील सुरुवात केली आहे. परंतु, Cisco कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, ट्विटर, मेटा आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. रिपोर्टनुसार, Google देखील लवकरच कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्या कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी करत आहोत व अनावश्यक कपात टाळण्याचा देखील प्रयत्न असेल. ट्विटरने जगभरातील तब्बल ५००० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मेटाने देखील तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातीमुळे ही आर्थिक मंदीची सुरुवात तर नाही ना, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT