Tech Tips esakal
विज्ञान-तंत्र

Tech Tips : लॅपटॉप, मोबाईल चार्ज करायला विजेची आवश्यकता नाही ! ही आयडिया वापरुन वाचवा लाईट बील

गेल्या काही वर्षात महागाईचा भस्मासुर वाढलाय

सकाळ डिजिटल टीम

Tech Tips : गेल्या काही वर्षात महागाईचा भस्मासुर वाढलाय. या काळात वीजेची बिलं पण खूप जास्त येत आहेत. कितीही काटकसर केली तरी वीजेच्या बिलावरील आकडे पाहूनच सामान्य माणसाला धडकीच भरते. या प्रकरणी अनेकदा तक्रारी केल्या जातात. पण बिल मात्र दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. दरम्यान हे वाढते बिल कमी करण्यासाठी व विजेची बचत व्हावी यासाठी काही आयडिया वापरात येऊ शकतात. जसं की वीज न वापरता तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज करता येऊ शकतो.

विजेशिवाय स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला एक डिव्हाईस विकत घ्यावं लागेल. हे डिव्हाईस दुसरं तिसरं काही नसून सोलर बँक आहे. मार्केट मध्ये अवघ्या दोन हजारात ही बँक उपलब्ध आहे.सोलर पॉवर बँक चार्ज करण्यासाठी वीज लागत नाही. तुम्ही सूर्यप्रकाशाच्या मदतीने ती चार्ज करू शकता. ही बँक अगदी सामान्य पॉवर बँक सारखी असते. यात चार्जिंगसाठी सोलर पॅनलही आहे.

हे डिव्हाईस काही तास सूर्यप्रकाशात चार्जिंगसाठी ठेवल्यानंतर तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही यावर इअरबड्स, नेकबँड, लॅपटॉप आदी गोष्टीही चार्ज करू शकता. सोलर पॅनेलमुळे सोलर पॉवर बँकेचं वजन सामान्य पॉवर बँकेपेक्षा थोडं जास्त असतं. तुम्ही ही पॉवर बँक Amazon किंवा Flipkart वरून खरेदी करू शकता. त्याची किंमत 2 हजार रुपयांपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT