Elon Musk brain chip Neuralink
Elon Musk brain chip Neuralink sakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk brain chip Neuralink : ‘न्युरालिंक’ला मानवी चाचण्यांची परवानगी

सकाळ वृत्तसेवा

सॅनफ्रान्सिस्को : जागतिक कीर्तीचे आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांच्या ‘न्युरालिंक’ या ब्रेन चिप स्टार्टअपने एक महत्त्वाचा टप्पा पार करताना मानवी मेंदू आणि संगणकातील संवादाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.

या ब्रेन मशिन इंटरफेस कंपनीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) प्रयोगशाळेतील मानवावरील चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे. हा ‘न्युरालिंक’च्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

‘न्युरालिंक’ने या परवानगीचे स्वागत केले असून थेट मानवी सहभाग असलेल्या प्रयोगांना सुरूवात करण्याबाबत उत्साही आणि समाधानी आहोत असे कंपनीकडून सांगण्यात आले. ‘न्युरालिंक’ने या परवानगीबाबतचे ट्विट केल्यानंतर ते मस्क यांनी ते शेअर केले.

मध्यंतरी मस्क यांनीच ‘न्युरालिंक’ने तयार केलेले डिव्हाईस मेंदूमध्ये बसविल्यानंतर व्यक्तीला आपल्या मनाचा वापर करून संगणकाशी संवाद साधता येऊ शकेल, असे म्हटले होते. मध्यंतरी याच कंपनीने या डिव्हाईसच्या माकडांवर घेतलेल्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष हाती लागले होते.

या प्राण्यांना न्युरालिंक इंटरफेसच्या माध्यमातून व्हिडिओ गेम खेळणे शक्य झाले होते तसेच कर्सरची हालचाल देखील करता आली होती. या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि क्षमता खूप मोठी असल्याने त्यामुळे मानवाला गेलेली त्याची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता देखील परत मिळवता येऊ शकेल असे मानले जाते. मस्क यांना हे तंत्रज्ञान केवळ वैद्यकीय ॲप्लिकेशन पुरते मर्यादित ठेवायचे नाही. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी मेंदूच्या क्षमतांमध्ये आणखी वाढ करणे हे मस्क यांचे ध्येय आहे.

वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती शक्य

न्युरालिंकच्या चिपमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल असे बोलले जाते. कंपनीने तयार केलेल्या मायक्रोचिपच्या माध्यमातून अर्धांगवायू आणि अंधत्व आलेल्या रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतील. तसेच काही दिव्यांगांना संगणक आणि मोबाईल तंत्रज्ञान वापरताना त्याचा लाभ होऊ शकतो. या चिपच्या माकडांवर घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मेंदूकडून येणाऱ्या संदेश लहरींची विश्लेषण करण्याची क्षमता या चिपमध्ये असून ब्लूटूथच्या माध्यमातून ही माहिती डिव्हाईसकडे पाठविली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT