Technology news
Technology news esakal
विज्ञान-तंत्र

Technology : Amazon Sale मध्ये Redmi 10A Sport झाला खूपच स्वस्त, नवीन किंमत वाचून व्हाल थक्क

सकाळ वृत्तसेवा

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi 10A Sport ची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हा फोन भारतामध्ये जुलैमध्ये Rs.१०,९९९ च्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

पण आता Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये हा फोन अगदी कमी किमतीत आला आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमुळे लॉन्च किमतीच्या तुलनेत तो खूप स्वस्त मिळतो आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर उपलब्ध आहे.

Redmi 10A Sport ची किंमत आता किती आहे?

हा फोन आता Amazon Great Indian Festival Sale मध्ये Rs ९,९९९ मध्ये उपलब्ध आहे. SBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना फोनवर अतिरिक्त १० टक्के सूट (जास्तीत जास्त १२५० रुपये) मिळू शकते. या ऑफरनंतर तुम्ही हा फोन ८,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर ९,४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे, ज्यामुळे हा फोन अतिशय स्वस्तात मिळू शकतो.

Redmi 10A Sport ची वैशिष्ट्ये

मेमरी- या फोनमध्ये 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 GB पर्यंत वाढवता येते.डिस्प्ले- या फोनमध्ये 6.53 इंच स्क्रीनवर HD+ डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 1600 × 720 पिक्सेल आहे.

प्रोसेसर- या फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे.कॅमेरा- या फोनमध्ये 13 MP चा सिंगल रियर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.बॅटरी- 5000 mAh ची बॅटरी या फोनमध्ये उपलब्ध आहे तसेच 10 W फास्ट चार्जिंग फीचर देखील यामध्ये उपलब्ध आहे.OS- हा फोन Android 12 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो.

इतर वैशिष्ट्ये

या फोनमध्ये 4G नेटवर्क, वाय-फाय, ब्लूटूथ आवृत्ती 5.0, जीपीएस, मायक्रो यूएसबी आणि 3.5 मिमी जॅक यांसारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT