Telecom company Vodafone
Telecom company Vodafone esakal
विज्ञान-तंत्र

जगातील पहिला SMS होता 14 शब्दांचा; 30 वर्षांनी होणार लिलाव

सकाळ डिजिटल टीम

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) जगातील पहिल्या एसएमएसचा लिलाव करणार आहे.

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) जगातील पहिल्या एसएमएसचा लिलाव करणार आहे. हा जगातील पहिला SMS 14 शब्दांचा होता आणि तो 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत लिलावासाठी तयार आहे. कंपनीनं सांगितलं, की या एसएमएसचा नॉन-फंगीबल टोकन Non-Fungible Token (NFT) म्हणून लिलाव केला जाणार असून कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तशी पोस्टही शेअर केलीय. व्होडाफोनचा हा पहिला NFT आहे आणि कंपनी जगातील पहिला SMS मजकूर लिलाव करण्यासाठी NFT मध्ये रूपांतरित करत आहे. लिलावात $2 लाख (अंदाजे रु. 1,52,48,300) पेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, कंपनी निर्वासितांच्या मदतीसाठी लिलावानं मिळालेली रक्कम दान करणार असल्याचंही कळतंय.

1992 मध्ये पाठवला पहिला SMS

जगातील पहिला एसएमएस 3 डिसेंबर 1992 रोजी व्होडाफोन नेटवर्कद्वारे पाठवण्यात आला होता. सुमारे तीन दशकांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या एसएमएसमध्ये 'मेरी ख्रिसमस'चा (Merry Christmas) संदेश होता. व्होडाफोनचे कर्मचारी रिचर्ड जार्विस यांनी हा एसएमएस स्वीकारला होता. दरम्यान, जगातील पहिल्या SMS NFT चा लिलाव 21 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये (Paris) होणार आहे. लिलावात बोली लावण्यासाठी तुम्ही ऑनलाइन देखील सहभाग घेऊ शकता.

NFT खरेदीदारांना प्रमाणपत्रही मिळणार

व्होडाफोननं आश्वासन दिलंय, की पहिल्या आवृत्तीत विशेष NFT तयार करण्यात आला असून भविष्यात जगातील हा पहिला SMS दुसरा NFT तयार करणार नाही. NFT घेणार्‍या खरेदीदारांना Vodafone समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड (Nick Reed) यांनी स्वाक्षरी केलेलं प्रमाणपत्र देखील दिलं जाणार असून जे NFT च्या विशिष्टतेची आणि सत्यतेची हमी देईल. जे ग्राहक NFT खरेदी करतात, त्यांना व्होडाफोनकडून मूळ संप्रेषण प्रोटोकॉलची तपशीलवार प्रतिकृती देखील मिळणार आहे. यासोबतच, ग्राहकांना व्होडाफोनकडून TXT आणि PDF फाइल्समध्ये मूळ प्रत देखील मिळणार आहे.

8 कोटींहून अधिक निर्वासितांना होणार मदत

अहवालानुसार, या लिलावात 2 लाख डॉलर्स (सुमारे 1,52,48,300 रुपये) पेक्षा जास्त रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. Vodafone नं या लिलावात जमा झालेली रक्कम UNHCR ला दान करणार असल्याची घोषणा केलीय. यामुळं युद्ध आणि इतर कारणांमुळं बेघर झालेल्या 82.4 दशलक्ष (सुमारे 8.24 कोटी) लोकांना मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT