telegram
telegram  
विज्ञान-तंत्र

Telegram वापरताय? असे आहेत नवे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

टेलीग्राम (Telegram) अॅप पुर्वीपेक्षा अधिक चांगले झाले आहे. नवीन अपडेटमुळे युजर्सना शेअर केलेल्या गोष्टी हाय-स्पीड स्क्रोलिंग आणि कॅलेंडर व्ह्यूमध्ये पाहाता येऊ शकतील, शेअर्ड मीडिया पेजसाठी अॅपमध्ये नवीन डेट बार आला आहे.यामुळे महिना - दिवसानुसार फोटो आणि व्हिडिओ शोधणे युजर्सना खूप सोपे होणार आहे.

या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिन चॅट कोण पाहू किंवा सामील होऊ शकतो हे ठरवू शकतो. तसेच, टेलिग्रामच्या नवीन अपडेटमध्ये ग्लोबल चॅट थीमसह नवीन इंटरएक्टिव्ह इमोजी जोडण्यात आले आहेत. टेलीग्राम iOS युजर्सना त्यांना बाकीच्यांना फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी किती वेळ लागेल याचीही माहिती देईल, व्हॉट्सअॅपमध्ये असे फिचर अद्याप आलेले नाही.

कॅलेंडर व्ह्यूचा फायदा - शेअर मिडिया पेजला नवा कॅलेंडर व्ह्यू मिळाला आहे. तो युझर्सना विशिष्ट तारखेपासून किती वापर झाला तो मीडिया शोधण्याची परवानगी देईल.तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा दोन्हीद्वारे शेअर केलेले मीडिया फिल्टर करू शकता.त्यासाठी आधी चॅट हेडरवर टॅप करून आणि नंतर खाली स्क्रोल करून त्यावर या. नंतर मेनू आयकॉनवर क्लिक करा. तेथे शेअर केलेल्या मीडियामध्ये तारखेपर्यंत पोहोचल्यानंतर, तुम्ही ते पाहण्यासाठी झूम-इन किंवा झूम-आउट करू शकता. असे काम संपूर्ण गॅलरीमध्ये करता येते. यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीडिया पाहू शकता.

ग्रुप किंवा अॅडमिनला अधिक नियंत्रण - नवीन अपडेटमध्ये अॅडमिनसाठी प्रिव्ह्यूचा पर्याय दिला आहे. जेव्हा कोणताही युजर इन्व्हीटेशन पाठवलेल्या लिंकवर क्लिक करेल, तेव्हा Admin Approval स्वतःहून कार्यरत होईल. एडमिनला रिक्वेस्ट पाठवायला युजरला एक बटन मिळेल.एडमिन चॅटच्या शीर्षस्थानी असलेल्या नवीन बारद्वारे ही विनंती व्यवस्थापित करू शकतात. एडमीनला कोणाची रिक्वेस्ट स्विकारयची किंवा नाही ते ठरविण्याचा अधिकार आहे. एडमिन युजराचा बायो आणि सार्वजनिक प्रोफाइल फोटो पाहू शकतात.

iOS वापरकर्त्याला वेळ सांगेल- iOS वर सामायिक केलेली स्थाने आता नवीन अपडेटसह संक्रमण वेळ दर्शवतील. म्हणजे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती दिली जाईल. यासाठी तुम्हाला Shared Location वर क्लिक करावे लागेल. नवीन अपडेटमध्ये, वापरकर्त्यांना फुलस्क्रीन इफेक्टसह नवीन इमोजी मिळतील. तसेच, iOS साठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT