Telegram 200 People Group Video Call Feature esakal
विज्ञान-तंत्र

Telegram Video Call : टेलिग्रामचं नवीन फीचर अन् गुगल, मायक्रोसॉफ्टला टेन्शन; व्हिडिओ कॉलसाठी एकदम बेस्ट, अपडेट बघा एका क्लिकवर

Telegram 200 People Group Video Call Feature : टेलिग्रामने आता एकाच वेळी 200 लोकांसाठी मोफत एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ग्रुप व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू केली आहे.

Saisimran Ghashi

Telegram Video Call New Feature : टेलिग्रामने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांना खुशखबर दिली आहे. आता एकाच ग्रुपमध्ये तब्बल 200 लोकांसोबत मोफत एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या नव्या अपडेटमुळे टेलिग्रामने गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मनाही मागे टाकले आहे.

एन्क्रिप्टेड व्हिडीओ कॉल

पूर्वी फक्त ग्रुप चॅट तयार केल्यावर कॉल करता येत होते, पण आता यासाठी ग्रुप तयार करण्याची गरज नाही. युजर्स थेट व्हिडीओ कॉल लिंक्स किंवा QR कोड च्या माध्यमातून 200 लोकांपर्यंत कॉल करू शकतात. सर्व कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असून ब्लॉकचेनसारख्या सिक्युरिटी आर्किटेक्चरचा वापर केला जातो. कॉल चालू असताना स्क्रीनवर दिसणाऱ्या चार इमोजींच्या माध्यमातून युजर्स सिक्युरिटी व्हेरिफाय करू शकतात.

टेलिग्रामचा दावा आहे की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या एन्क्रिप्शनला कोणीही तोडू शकलेले नाही आणि आजही $1 लाख (जवळपास ₹84 लाख) चा बक्षीस चॅलेंज आहे.

बिझनेस युजर्ससाठी नवे टूल्स

टेलिग्रामने आपल्या प्रिमियम बिझनेस अकाउंट्ससाठी देखील अनेक नवे टूल्स उपलब्ध करून दिले आहेत.

  • आता AI बॉट्सच्या मदतीने मेसेजिंग, ट्रान्झॅक्शन, प्रोफाइल एडिटिंग, स्टोरी पोस्टिंग यासारख्या गोष्टी ऑटोमेट करता येणार आहेत.

  • बॉट्सना कोणती परवानगी द्यायची हे बिझनेस युजर्स कस्टमाइझ करू शकतात जे त्यांना जास्त नियंत्रण देतं.

नवीन मोडरेशन आणि अ‍ॅपील सिस्टम

टेलिग्रामने पारदर्शकतेसाठी एक नवा मोडरेशन सिस्टम आणला आहे. कोणताही अकाउंट नियमभंग केल्यास तो ‘फ्रोजन’ स्थितीत ठेवला जातो. युजर थेट अ‍ॅपमधूनच अपील करू शकतो आणि जर अपील यशस्वी ठरले, तर सर्व निर्बंध हटवले जातात. ही प्रणाली सुरक्षा आणि युजरच्या हक्कांमध्ये संतुलन राखते.

गेस्चर कंट्रोल्स फीचर्स

युजर एक्सपीरियन्स अधिक सहज करण्यासाठी टेलिग्रामने काही नवीन गेस्चर फीचर्स देखील आणले आहेत.

  • आता Android आणि iOS वर तुम्ही मेसेजला फक्त शेअर बटनवर ड्रॅग करून फॉरवर्ड करू शकता.

  • iOS युजर्ससाठी, स्टोरी फीडवरून उजव्या बाजूला स्वाइप केल्यास थेट स्टोरी एडिटर ओपन होतो.

सततच्या अपग्रेड्स आणि नव्या फीचर्ससह टेलिग्राम आपल्या वापरकर्त्यांसाठी एक प्रायव्हसी-केंद्रित आणि नवोन्मेषी प्लॅटफॉर्म तयार करत आहे. ही अपडेट्स केवळ टेक्नॉलॉजीचा उपयोग करणाऱ्या सामान्य वापरकर्त्यांसाठीच नव्हे तर बिजनेस प्लेससाठीही फार उपयुक्त ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : नाइटक्लबचा मालक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर, २२ शहरं आणि ४ देशांमध्ये व्यवसाय; कोण आहे सौरभ लुथरा?

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा! हवामानविषयी दिली मोठी अपडेट, विभागानं नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मंगला लक्षदीप ट्रेनमध्ये खुलेआम दारू गुटका व अमली पदार्थांची विक्री

Agricultural News : 'एकरी पाच क्विंटल' जाचक अटीमुळे शेतकरी हैराण; सीसीआय खरेदीकडे कापूस उत्पादकांची पाठ!

टीआरपी कमी झाला की पटकन पात्राला मारून टाकतात... मालिकांबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोखठोक सवाल

SCROLL FOR NEXT