tesla ceo elon musk bringing new social media site x com check details  
विज्ञान-तंत्र

X.com : एलॉन मस्क नवीन सोशल मीडिया साइट काढण्याच्या तयारीत? काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

जागातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले उद्योजक एलॉन मस्क हे ट्विटरवर त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ओळखले जातात. ट्विटरवर सुरू असलेल्या कायदेशीर लढाई दरम्यान टेस्लाचे सीईओ मस्क यांनी आता नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचे संकेत दिली आहेत.

मस्क यांनी असं काहीतरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चच्या सुरुवातीला, एका चाहत्याने मस्कला विचारले की तो ओपन अल्गोरिदमसह सोशल मीडिया साइट बनविण्याचा विचार करतील का, ज्यावर त्यानी सांगितलं की तो त्याकडे लक्ष देत आतहे. काही आठवड्यांनंतर, त्यांनी $44 बिलियन मध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली, जी आता त्यांच्याकडून मागे घेण्यात आली आहे.

पण काही दिवसांपूर्वी (ऑगस्ट 10) दुसऱ्या एका चाहत्याने (@teslaownersSV) मस्क यांना विचारले की, तुम्ही तुमचे स्वतःचे सोशल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केला आहे का? ट्विटर डील पूर्ण झाली नाही तर काय? ज्याला मस्क यांनी एका शब्दात उत्तर दिले, "X.com". त्यांनी या बद्दल अधीकची कसलीही माहिती दिलेली नाही.

X.com काय आहे?

डोमेन X.com हे एलॉन मस्क यांच्यासाठी अजिबात नवीन नाही. ही वेबसाइट एका आर्थिक सेवेशी जोडलेली होती, जी अखेरीस Paypal मध्ये विलीन झाली. मस्क यांनी 2017 मध्ये PayPal कडून डोमेन नाव परत मिळवले. याक्षणी, वेबसाइट वापरली जात आहे, आणि वापरकर्त्यांना फक्त वरच्या-डाव्या बाजूला 'x' अक्षर दिसते.

मस्कने दुसर्‍या चाहत्याच्या ट्विटला उत्तर दिले होते की ट्विटर सोबतची कायदेशीर लढाई संपल्यानंतर त्याचे विकलेले टेस्ला शेअर्स परत विकत घेण्याची त्यांची योजना आहे. ट्विटरने 44 अब्ज डॉलर्सला प्लॅटफॉर्म विकत घेण्याच्या करारातून मागे हटल्याबद्दल एलोन मस्क यांच्यावर खटला दाखल केला आहे. प्रकरण न्यायालयात गोपनीय असल्याने अज्ञात कारणास्तव त्यांनी कंपनीवर आक्षेप घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर अप्रामाणिकपणाचा आरोप करत डीलमधून यू-टर्न घेतला होता. मस्क यांचा दावा आहे की सोशल मीडिया कंपनीने प्लॅटफॉर्मवर बॉट्स आणि स्पॅम प्रोफाइलची अचूक आकडेवारी उघड केली नाही. तर ट्विटरचे म्हणणे आहे की बॉट प्रोफाइल फक्त 5 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT