These are the things to keep in mind when buying a second hand car Sakal
विज्ञान-तंत्र

सेकंड हँड कार खरेदी करताय? या गोष्टी ठेवा लक्षात

सकाळ डिजिटल टीम

भारतातील वापरलेल्या कारची बाजारपेठ मोठी आहे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान वापरलेल्या कार विक्रेत्यांची संख्या देखील वाढत आहे. जर तुम्ही देखील वापरलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अशी कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे आज आपण त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहेत.

तुमचे बजेट ठरवा

सध्या कोरोनामुळे सर्वांची बचत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, तर घराच्या गरजाही पूर्ण कराव्या लागतात, त्यामुळे वापरलेली कार खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या बजेट रेंज किती आहे ते निश्चित करा, कारण जेव्हा तुमचे बजेट आधीच ठरलेले असते, तेव्हा तुम्ही कार खरेदी करताना मागेपुढे पाहत नाहीत. तुम्हाला माहित असेल की वापरलेली कार खरेदीसाठी किती बजेट आहे, तेव्हा तुम्हाला कार खरेदी करताना ते सोपे जाते.

तुम्हाला कोणत्या प्रकारची कार हवीय?

तुमच्या गरजेनुसार, तुम्ही ठरवू शकता की कोणत्या प्रकारची कार तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रथम तुम्हाला जी कार खरेदी करायची आहे ती निवडा मग ती एसयूव्ही असो की सेडान किंवा हॅचबॅक. एसयूव्हीसाठी सेडान किंवा हॅचबॅकपेक्षा जास्त किंमती द्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला SUV साठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

बाजारात जाण्यापूर्वी...

ऑनलाइन रिसर्चद्वारे, तुम्ही तुम्हाला खरीदी करायची आहे त्या कारच्या फीचर्सबद्दल सहज माहिती घेऊ शकता, तसेच तिच्या सध्याच्या किंमतीची कल्पना देखील मिळवू शकाल. अनेक सेकंड-हँड कार डीलर्स ऑनलाइन देखील शोधता येता, ज्यांच्याकडे तुम्हाला चांगली डिल मिळू शकेल. त्याच वेळी, तुम्ही तुमच्या आवडत्या कारची तुलना इतर कारशी देखील करू शकता.

वापरलेली कार चेक करा

जेव्हा तुम्ही तुमची निवडलेली कार युज्ड कार मार्केटमधून किंवा ऑनलाइन मार्केटमधून खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा कारची चांगली तपासणी करा. कारच्या बॉडीवर टच-अप, रीपेंट किंवा डेंट आहेत का हे तपासा. असे काही असेल तर त्याचा नापर वाहनांची किंमत कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, कारचे टेक्निकल तपासण्यासाठी तुम्ही मेकॅनिकची मदत घेऊ शकता. तसेच टायर ट्रेड, बॅटरी लाइफ इत्यादी तपासून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT