Upcoming Smartphones esakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Smartphones : मार्चमध्ये Samsung Galaxy F 15 ते Realme 12+5G हे दमदार स्मार्टफोन्स होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Upcoming Smartphones : अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. या मार्च महिन्यात अनेक मोठ्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Upcoming Smartphones : अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. या मार्च महिन्यात अनेक मोठ्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. मार्केटमध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy F 15, Nothing Phone (2a), Realme 12+5G  सारख्या मोबाईल कंपन्या त्यांचे फ्लॅगशिप मोबाईल लाँच करणार आहेत.

आज आपण मार्चमध्ये लाँच होणाऱ्या काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचे फिचर्स आणि किंमत.

Realme 12+5G  

रिअल मी या कंपनीचा हा स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार आहे. ६ मार्चला हा मोबाईल लाँच होण्याची दाट शक्यता आहे. काही डिटेल्ससहीत हा मोबाईल फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. प्रिमियम डिझाईन आणि पॉवरफूल प्रोसेसरसहीत हा मोबाईल लाँच केला जाईल. विशेष म्हणजे या मोबाईलमधय्ये कंपनीने Sony LYT-600 Ois ही लेन्स दिली आहे. हा मोबाईल २० हजारांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F 15

सॅमसंग या कंपनीचा हा आगामी फोन Samsung Galaxy F 15 फ्लिपकार्ट या वेबसाईटवर काही महत्वाच्या डिटेल्ससहीत उपलब्ध करण्यात आला आहे. ४ मार्चला हा मोबाईल लाँच करण्यात येईल. सॅमसंगचा हा मोबाईल लाँच झाल्यानंतर तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या तगड्या मोबाईलमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 6000 mAh ची मोठी बॅटरी असेल. या मोबाईलची किंमत १५ हजारांपर्यंत असू शकते.

Nothing Phone (2a)

ट्रान्सपरंट नथिंग फोन (2a) या मोबाईलची लाँचिंगची तारीख समोर आली आहे. हा मोबाईल ५ मार्चला लाँच केला जाणार आहे. फ्लिपकार्ट या वेबसाईटवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. या मोबाईलच्या लाँचसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कंपनी त्यांचे इअरबड्सही लाँच करू शकते. जर तुम्ही हा मोबाईल घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ५ मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. या मोबाईलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यापूर्वी एकनाथ शिंदेंनी देखील GR दिला होता मग आता नवीन काय? मराठ्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर! सगेसोयरे पण मार्ग दुसरा

Pune News : आयटी कंपनीच्या संचालकावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल, पोलिसांचा शोध सुरू

दुर्दैवी घटना ! 'शेतजमिनीतील खड्यात आढळला महिला आणि बालिकेचा मृतदेह'; कासारवडवली येथील घटना

US Open: लेकीला दिलेलं प्रॉमिस नोव्हाक जोकोव्हिचने केलं पूर्ण, सामना जिंकताच 'Soda Pop' डान्स Video Viral

GST Meeting: काय स्वस्त अन् काय महाग होणार? GST परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गाला दिलासा मिळणार की धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT