three features of smartphone like call log control notifications and test mode nagpur news 
विज्ञान-तंत्र

वारंवार येणाऱ्या नोटीफिकेशनचा कंटाळा आलाय? मग स्मार्टफोनमधील 'हे' फिचर्स बघा अन् करा सुटका

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपला दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा स्मार्टफोनवरच जात असतो. कारण ऑफीसचे काम असतील तरी त्यामध्येही स्मार्टफोनची गरज असते. मात्र, हा फोन वापरताना आपल्याला अनेक एडव्हान्स टेन्कॉलॉजी माहिती नसतात. त्या वापरून आपण आणखी आपलं जगण सरल करू शकतो. आज आम्ही स्मार्टफोनच्या अशाच काही हटके फिचर्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Call Logs करा कंट्रोल -
आपले नातेवाईक किंवा मित्र आपल्या फोनवरून कोणत्याही क्रमांकावर फोन करत असतात. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनवरून कुणीही कॉल करू नये, तर त्यासाठी आम्ही सांगतो ती भन्नाट ट्रीक फॉलो करा. कॉल लॉग्सला ब्लॉक करायचा असेल तर *#31# डायल करावे लागेल. हे केल्यानंतर तुमच्या फोनवरून कोणालाही कॉल लागणार नाही. ही सर्विस डिसेबल करायची असेल तर #31# डायल करा.

नको असलेल्या नोटीफिकेशनपासून करा सुटका -
आपल्या फोनमध्ये वारंवार नोटीफिकेशन येत असतात. अनेकदा आपल्याला त्याचा त्रास होतो. तुम्हालाही अशा नोटीफिकेशनपासून सुटका हवी असेल तर एक साधी प्रोसेस पार पाडावी लागेल. यासाठी सेंटिग्समध्ये जाऊन नोटीफिकेशनमध्ये जा. त्याठिकाणी ज्या अॅप्लीकेशनच्या नोटीफिकेशन तुम्हाला बंद करायच्या असतील त्या अॅपला सिलेक्ट करा आणि कोल्ज नोटीफिकेशन करा.

Test Mode -
आपल्या स्मार्टफोनमध्ये Test Mode देखील असतो. त्यामध्ये तुम्ही फोनचा डिस्प्ले, सेंसर्स, माइक आदी गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासून शकता. एका गुप्त कोडद्वारे तुम्ही Test Mode ओपन करू शकता. त्यासाठी *#0*# डायल करा. हा कोड टाकताच Test Mode ओपन होईल. त्यामध्ये अनेक ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला ज्याबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा. त्याबाबत तुम्हाला माहिती मिळेल. जेव्हा तुम्ही एखादा सेकंड हँड फोन खरेदी करता त्यावेळी हे फिचर्स नक्कीच कामात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT