Court Decision eSakal
विज्ञान-तंत्र

Court Decision : चॅटमध्ये दिलेला 'थम्ब इमोजी' देखील अ‍ॅग्रीमेंट अप्रूव्हलसाठी पुरेसा; ८२ हजार डॉलर्स भरपाईचे कोर्टाचे आदेश!

कॅनडामधील एका न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे.

Sudesh

सोशल मीडिया आणि मेसेंजिंग अ‍ॅप्सवर चॅटिंग करताना आपण कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपल्या भावना दाखवण्यासाठी, किंवा मग शब्दांशिवाय बोलण्यासाठी हे इमोटिकॉन्स बरेच फायदेशीर ठरतात. मात्र, आता एखाद्या अ‍ॅग्रीमेंटचं अप्रूव्हल म्हणूनही इमोजी पुरेसे असल्याचा निकाल कॅनडामधील एका न्यायालयाने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

कॅनडामधील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फ्लेक्सची ऑर्डर दिली होती. मात्र, त्याला फ्लेक्सची डिलिव्हरी मिळाली नाही. हे दोघांमधील अ‍ॅग्रीमेंटचं उल्लंघन असल्याचं म्हणत पहिल्या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली होती. तसेच, प्रतिवादीकडून नुकसान भरपाईची मागणीही या व्यक्तीने केली होती.

या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, की त्याने ऑर्डरच्या अ‍ॅग्रीमेंटची एक कॉपी समोरच्या पक्षाला चॅटमध्ये पाठवली होती. यासोबत असा प्रश्नही विचारला होता, की तो या अ‍ॅग्रीमेंटशी सहमत आहे का? प्रतिवादीने या मेसेजला रिप्लाय म्हणून 'थम्ब्स अप' ही इमोजी पाठवली होती. म्हणजेच, समोरच्या पक्षाने अ‍ॅग्रीमेंट मान्य केली होती.

अ‍ॅग्रीमेंटवर नव्हती सही

यावेळी प्रतिवादीने अ‍ॅग्रीमेंटचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा केला. चॅटमध्ये आपल्याला अ‍ॅग्रीमेंट मिळालं होतं. मात्र, त्यावर आपली सही नव्हती, आणि त्याबाबत कोणताही करार किंवा नोट तयार करण्यात आली नव्हती. या अ‍ॅग्रीमेंटमध्ये पूर्ण नियम आणि अटी स्पष्ट करण्यात आल्या नव्हत्या; तसेच सही करण्यासाठी याची कॉपी ईमेलवर देखील पाठवण्यात आली नव्हती असंही या व्यक्तीने म्हटलं.

कोर्टाचा निर्णय

कोर्टाने याबाबत निकाल देताना प्रतिवादीचा दावा फेटाळून लावला. एखाद्या अ‍ॅग्रीमेंटच्या अप्रूव्हलसाठी सही गरजेची आहे. मात्र, सध्याच्या काळात चॅटिंगमध्ये इमोजीचा होणारा वापरही लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे थम्ब इमोजीने दिलेला रिप्लाय हा सहमती दर्शवतो, असं कोर्टाने स्पष्ट केलं. यासोबतच, चॅटमध्ये प्रतिवादीने अ‍ॅग्रीमेंटबद्दल 'ओके', 'हे ठीक वाटतंय' अशा प्रकारचे मेसेजही केले होते; हेदेखील न्यायालयाने स्पष्ट केलं.

८२ हजारांची भरपाई

न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, आता याचिकाकर्त्याला नुकसानभराई म्हणून ८२ हजार डॉलर्स मिळणार आहेत. प्रतिवादीने ही रक्कम याचिकाकर्त्याला द्यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. इमोजींच्या वापरामुळे भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे वाढू शकतात, त्यामुळे त्यासाठी आपण तयार रहायला हवं, असंही न्यायाधीश यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump solar tariff: गोड-गोड बोलून ट्रम्पचा भारताला झटका; सौरऊर्जेवर १२६ टक्के टॅरिफ, आता नेमके काय परिणाम होणार?

भरधाव थारची कारला धडक, एकाचा मृत्यू; तरुणी चालवत होती थार, अपघातानंतर सीट बदलली

T20 World Cup: यजमान श्रीलंकेचं भवितव्य आज ठरणार! न्यूझीलंडविरुद्ध रंगणार महत्त्वाचा सामना

'माझ्यावर होणाऱ्या टीकेवर...' समांथा प्रभूने सांगितला मानसिक आरोग्य जपण्याचा फॉर्म्युला

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

SCROLL FOR NEXT