Used Car Loan eSakal
विज्ञान-तंत्र

Used Car Loan : सेकंड हँड कारसाठी लोन घेताय? 'या' गोष्टींची खबरदारी घ्या, होईल मोठा फायदा

सध्या स्वतःच्या मालकीची कार असणं ही केवळ चैनीची नाही, तर गरजेची बाब झाली आहे..

Sudesh

सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच जात आहे. मात्र सोबतच लोकांच्या गरजाही वाढत आहेत. स्वतःच्या मालकीची कार असणं ही केवळ चैनीची नाही, तर गरजेची बाब झाली आहे. यामुळेच, लोक यासाठी सेकंड हँड कार खरेदी करण्याकडे झुकत आहेत.

तुम्हीदेखील सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल, आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशा वेळी काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज आहे.

कर्जासाठी अटी

जर तुम्ही घेत असलेली कार तीन वर्षांहून जुनी असेल तर कित्येक बँका आणि पतसंस्था कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. तसेच, यूज्ड कार घेताना इन्शुरन्सची रक्कम लोन अमाउंटमध्ये जोडली जाण्याची शक्यता कमीच असते.

खबरदारी गरजेची

कर्ज घेताना ईएमआय रक्कम आणि रिपेमेंटच्या अटी नीट वाचणं गरजेचं आहे. अन्यथा, जुन्या कारसाठी तुम्ही ईएमआयच्या जंजालात अडकून नवीन कारएवढेच पैसे द्यावे लागतील. लोनसाठी अप्लाय करताना तुमचा क्रेडिट स्कोअरही चांगला हवा, अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

काय आहेत फायदे?

सेकंड हँड गाडीसाठी कर्ज काढण्याचे बरेच फायदे आहेत. तुम्ही सेकंड हँड गाडी घेत असल्यामुळे आधीच तुमचा खर्च कमी होत असतो. त्यातच कर्ज काढल्यामुळे तुम्हाला पदरचे जास्त पैसे टाकावे लागत नाहीत. कित्येक बँका किंवा पतसंस्था कार लोनसाठी १०० टक्के वित्तपुरवठा करतात. कर्जाची रक्कम कमी असल्यामुळे ईएमआय देखील कमी बसतो.

असं करा अप्लाय

सेकंड हँड कारसाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही घरबसल्या बँक किंवा नॉन बँकिंग फायनॅन्शिअल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवर यासाठी अप्लाय करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही बँक किंवा पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये जाऊन देखील कर्जासाठी अर्ज करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT