Aadhar Card
Aadhar Card Esakal
विज्ञान-तंत्र

Aadhaar Card: तुमच्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर आहेत? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Aadhar Card : मोबाईल फोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याशिवाय बरीचशी कामे होऊ शकत नाहीत. तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर आहेत, हे जाणून घ्यायचे असेल तर दूरसंचार पोर्टल (Telecom Portal) तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (DoT) च्या नवीन पोर्टलद्वारे आधार कार्डवरील इश्यू सिम देखील तपासू शकता. यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या आधारवर किती सिम जारी केले आहेत. (Tips to Know How many mobile numbers are linked with your Aadhar card?)

येथे मदत मिळवा-

DoT ने 'टेलीकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन' (TAFCOP) नावाचे एक पोर्टल लाँच केलं आहे. दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, आधार कार्डवरून फक्त 9 मोबाईल क्रमांक नागरिकांना दिले जाऊ शकतात. हे पोर्टल केवळ माहितीच देत नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देण्यासही मदत करते. हे क्रमांक तुम्ही वापरत नसल्यास आधार कार्डशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी ते बंद केले जातील.

तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबर तपासण्यासाठी आणि पडताळण्यासाठी या या स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: TAFCOP च्या https://tafcop.dgtelecom.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडा.

स्टेप 2: OTP प्राप्त करण्यासाठी तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर एंटर करा.

स्टेप 3: पोर्टलवर साइन इन करण्यासाठी OTP प्रविष्ट करा आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

स्टेप 4: आता साइन-इन करा.

स्टेप 5: नंतर तुम्हाला एका पेजवर नेले जाईल. येथे तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व मोबाईल नंबर पाहू शकता.

तुम्हाला वापरात नसलेले नंबर दिसले किंवा तुम्ही ते ओळखत नसाल तर त्यांची तक्रार करा. त्यानंतर ते तुमच्या आधार कार्डमधून काढून टाकले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही - अजित पवार

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT