TOP 10 TWEETS OF THE YEAR
TOP 10 TWEETS OF THE YEAR SAKAL
विज्ञान-तंत्र

Top 10 Tweets | मोदी, कोहलीचा ट्विटरवर बोलबाला

ऋषिराज तायडे

Top 10 Tweets of the Year: जगाच्या पाठीवर कुठलीही घडामोड असो, किंवा एखादा कोणताही प्रसंग, त्याचे बरेवाईट पडसाद सोशल मीडियावर (Social Media) पडतातच. त्यातही ट्विटरवरील (Twitter) संबंधित घटनेबाबत नेटकऱ्यांच्या प्रतिसादातून ट्रेण्ड तयार होतात. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत ट्विटरवरील ट्रेण्डच्या (Tweeter Trends) आधारे संबंधित घटनेबाबत देशाचा नेमका कल काय आहे, याचेही ठोकताळे मांडले जातात. त्यानुसार गेल्या वर्षभरात भारतात कुठले ट्रेण्ड सर्वाधिक चर्चेत होते आणि कुठल्या ट्विट्सला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, याबाबत ट्विटरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. (1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर दरम्यानची आकडेवारी)

सर्वाधिक रिट्विट झालेले ट्विट (Most Retweeted Tweets)-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला सर्वाधिक फटका बसला. त्यावेळी जगभरातून भारतासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स (@patcummins30) यानेही त्यावेळी भारतासाठी 50 हजार डॉलर्सची मदत जाहीर केली आणि इतर खेळाडूंनाही मदतीचे आवाहन केले होते. 26 एप्रिल 2021 ला केलेल्या या ट्विटला सर्वाधिक 1 लाख 14 हजाराहून अधिक रिट्विट मिळाले. हे ट्विट भारतातील गोल्डन 'ट्विट ऑफ द ईअर' ठरले.

सर्वाधिक लाईक झालेल ट्विट (Most Liked Tweet)-

क्रिेकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना यावर्षी कन्यारत्न प्राप्त झाले. याबाबतची गोड बातमी विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मुलीच्या जन्माबाबत विराटने (@imVkohli) 11 जानेवारी 2021 रोजी केलेल्या ट्विटला सर्वाधिक 5 लाख 40 हजार लाईक्स मिळाले. विराटचे हे ट्विट 2021 या वर्षात सर्वाधिक लाईक्स मिळवणारे ट्विट ठरले. तसेच गेल्यावर्षी अनुष्का गर्भवती असल्याबाबत विराटच्या ट्विटला 2020 मध्ये सर्वाधिक लाईक मिळाले होते.

क्षेत्रनिहाय टॉप ट्विट्स (Field wise top tweets)

1. सरकार (Government)-

* सर्वाधिक रिट्विट (Most Retweets) - पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi) यांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचा पहिला डोस घेतल्याबाबत केलेले ट्विट हे सरकार या क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट मिळवणारे ट्विट ठरले. त्यांच्या ट्विटला 45 हजार रिट्विट मिळाले. यावेळी त्यांनी नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते.

* सर्वाधिक लाईक्स (Most Likes) - ऑस्ट्रेलियाविरूद्ध गाबा कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi) यांनी केलेल्या कौतुकाचे ट्विट हे सरकारी क्षेत्रातील सर्वाधिक लाईक मिळवणारे ट्विट ठरले. या ट्विटला 2 लाख 26 हजार लाईक्स मिळाले होते.

2. उद्योग (Industry)-

* सर्वाधिक रिट्विट आणि लाईक - ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाच्या लिलाव झाला होता. 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटांकडे परत आल्याबद्दल उद्योगपती रतन टाटा (@RNTata2000) यांचे ट्विट उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट आणि लाईक झालेले ट्विट ठरले. टाटा यांच्या ट्विटला 82 हजारांहून अधिक रिट्विट आणि 4 लाख 3 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले होते.

3. मनोरंजन (Entertainment)-

* सर्वाधिक रिट्विट व लाईक - दक्षिणेतील अभिनेता विजय याने त्याच्या बिस्ट या चित्रपटाचा फर्स्ट लूक 8 जानेवारी 2021 रोजी सोशल मीडियावरून जारी केला. विजयच्या ट्विटला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. 1 लाख 37 हजार रिट्विट आणि 3 लाख 40 हजार लाईक्स घेत विजयचे ट्विट मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट आणि लाईक मिळवणारे ट्विट ठरले.

4. क्रीडा (Sports)-

* सर्वाधिक रिट्विट आणि लाईक - नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटलविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे चेन्नई सुपरकिंग्जने उपांत्य फेरीत प्रवेश केला. धोनीच्या कामगिरीबाबत रॉयल चॅलेंज बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीने (@imVkohli) केलेले ट्विट हे क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिक ट्विट ठरले. विराटच्या या ट्विटला 91 हजार रिट्विट आणि 5 लाख 30 हजार लाईक्स मिळाले होते.

टॉप 10 हॅशटॅग (Top 10 Hashtags)-

1. #Covid19

2. #FarmersProtest

3. #TeamIndia

4. #Tokyo2020

5. #IPL2021

6. #IndVEng

7. #Diwali

8. #Master

9. #Bitcoin

10 #PermissionToDance

विभागनिहाय टॉप ट्विटेड हॅशटॅग

1. चालू घडामोडी (Current Affairs)-

#Covid19

#Afghanistan

#CGL19marks

#IndianArmy

#Uttarakhand

2. सांस्कृतिक (Traditional)-

#Diwali

#EidMubarak

#RepublicDay

#IndependenceDay

#InternationalWomensDay

3. डिजिटल (Digital)-

#Bitcoin

#BSC

#Crypto

#NFT

#DeFi

ट्विटरवरील टॉप टेन ईमोजीस (Top 10 Emoji on Twitter)-

🙏

😂

🔥

😍

👍

😊

👇

🤣

😎

😭

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तोंदलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT