Top Electric Cars in 2023 eSakal
विज्ञान-तंत्र

Look Back 2023 : यावर्षी लाँच झाल्या तगड्या इलेक्ट्रिक कार्स; लोकांनी कुणाला दिली पसंती?

यातील काही गाड्या अगदीच हायटेक होत्या, तर काही गाड्या परवडणाऱ्या दरातील होत्या.

Sudesh

2023 हे वर्ष संपायला अगदी काही दिवसच शिल्लक आहेत. यावर्षी कित्येक कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या. यातील काही गाड्या अगदीच हायटेक होत्या, तर काही गाड्या परवडणाऱ्या दरातील होत्या. पाहूया या वर्षात आलेल्या टॉप 7 इलेक्ट्रिक कार.

ऑडी

Audi Q8 e-tron ही इलेक्ट्रिक एसयूव्ही गाडी यावर्षी लाँच झाली. एक कोटींपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या या गाडीची रेंज ही चर्चेचा विषय ठरली. सिंगल चार्जमध्ये ही कार तब्बल 582 किलोमीटर धावू शकते.

BMW

बीएमडब्ल्यू कंपनीची i7 ही इलेक्ट्रिक गाडी यावर्षी लाँच झाली. सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असणाऱ्या या सेडान गाडीची रेंज 625 किलोमीटर होती.

एमजी कॉमेट

यावर्षी MG कंपनीने आपली Comet ही डबल डोअर इलेक्ट्रिक कार लाँच केली. भारतातील ही पहिली डबल-डोअर इलेक्ट्रिक कार ठरली. याची रेंज 230 किलोमीटर एवढी आहे. याची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा

Tata कंपनीने आपल्या Nexon या इलेक्ट्रिक गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं. 14.74 लाख रुपयांना ही गाडी लाँच करण्यात आली होती. याची रेंज तब्बल 465 किलोमीटर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

महिंद्रा

Mahindra XUV400 ही इलेक्ट्रिक गाडी कंपनीने यावर्षी लाँच केली. ही गाडी 456 किलोमीटर रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंडाई

Hyundai कंपनीने आपली Ioniq5 ही इलेक्ट्रिक कार यावर्षी लाँच केली. याची किंमत 45 लाख रुपये आहे. प्रीमियम लुक आणि मजबूत पॉवरट्रेन यामुळे ही गाडी महाग असूनही लोकप्रिय ठरली. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 481 किलोमीटर धावू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT