TRAI New Tariff sakal
विज्ञान-तंत्र

TRAI New Tariff : केबल आणि DTH चे बिल होणार स्वस्त; 'या' दिवसापासून नवे नियम लागू

आता केबल आणि डीटीएच ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

TRAI New Tariff Order 2.0 : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर (New Tariff Order-NTO) 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. आता केबल आणि डीटीएच ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नवीन नियमानुसार, 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होऊ शकतील. TRAI चे सचिव, व्ही. रघुनंदन यांनी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलच्या ची किंमत निश्चित करताना, प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त 45 टक्के सूट देऊ शकतात. सध्या फक्त 33 टक्के सूट दिली जाऊ शकते. ट्रायचे म्हणणे आहे की, पे चॅनलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीवर आधारित असेल.

TRAI चे हे नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. TRAI च्या मते, टेलिव्हिजन चॅनेलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत, ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनेलनुसार सेवा प्रदान केल्या जातील.

ट्रायने असेही म्हटले आहे की, वितरक सर्व चॅनेलचे नाव, भाषा, चॅनेलची दरमहा किंमत आणि चॅनेलच्या प्लॅनची रचना आणि किमती मधील कोणत्याही बदलाचा अहवाल 16 डिसेंबर 2022 पर्यंत देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT