Truecaller AI Safety eSakal
विज्ञान-तंत्र

Truecaller AI Safety : 'एआय'च्या मदतीने स्पॅम कॉल्सना बसणार आळा; ट्रुकॉलरने लाँच केलं नवीन सेफ्टी फीचर

Max Protection Level : या फीचरचं नाव मॅक्स प्रोटेक्शन लेव्हल असं आहे. हे फीचर एआयचा वापर करून अनअप्रूव्ह्ड कॉन्टॅक्ट्सना स्वतःच ब्लॉक करून टाकतं.

Sudesh

Truecaller AI Safety Feature : आजकाल प्रत्येक ठिकाणी एआयचा वापर केला जात आहे. टेक कंपन्यांमध्ये तर आपल्या प्रॉडक्टमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरण्याची स्पर्धाच लागली आहे. याच यादीमध्ये आता ट्रुकॉलरचाही समावेश झाला आहे. ट्रुकॉलरने आपल्या अ‍ॅपमध्ये एक एआय फीचर जोडलं आहे. यामुळे यूजर्सना स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळणार आहे.

मॅक्स प्रोटेक्शन लेव्हल

या फीचरचं नाव Max Protection Level असं आहे. हे फीचर एआयचा वापर करून अनअप्रूव्ह्ड कॉन्टॅक्ट्सना स्वतःच ब्लॉक करून टाकतं. एवढंच नाही, तर ट्रुकॉलर डेटाबेसमध्ये एखाद्या नंबरबाबत माहिती नसेल, तरीही त्याला ब्लॉक करण्याची सोय या फीचरमध्ये आहे. यामुळे यूजर्सची फसवणूक होण्याला आळा बसणार आहे.

कसा करायचा वापर?

  • हे फीचर ट्रुकॉलरच्या 13.58 या पुढच्या व्हर्जनवर उपलब्ध आहे. म्हणजेच, तुमच्याकडे याच्या मागचं व्हर्जन असेल तर ते अपडेट करून घ्यावं लागेल.

  • यानंतर ट्रुकॉलर अ‍ॅप उघडून, वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा.

  • यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन ब्लॉक हा पर्याय निवडा.

  • यानंतर 'मॅक्स लेव्हल' हा पर्याय निवडावा लागेल.

  • यानंतर तुम्हाला हे फीचर वापरण्यासाठी सबस्क्रिप्शन पर्याय दिसतील. यातील एक प्लॅन निवडून तुम्ही पुढे जाऊ शकता.

हे फीचर केवळ ट्रुकॉलरच्या प्रीमियम यूजर्ससाठी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हालाही मॅक्स प्रोटेक्शन फीचर वापरायचं असेल, तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घेणं अनिवार्य आहे. हे फीचर केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

बेसिक प्रोटेक्शन

ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं नाही अशा यूजर्ससाठी ट्रुकॉलरचं बेसिक प्रोटेक्शन लेव्हल फीचर उपलब्ध आहे. यामध्ये केवळ ट्रुकॉलर डेटाबेसमध्ये असणाऱ्या स्पॅम नंबर्सना ब्लॉक करण्याची सोय उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Panchang 17 October 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Weather Update: अति हलक्या पावसाची पुणे परिसरात शक्यता

SCROLL FOR NEXT