TVS Ronin 2025 price specifications and Features esakal
विज्ञान-तंत्र

TVS Ronin 2025 : एक झलक सबसे अलग! बुलेटला टक्कर देणार ही नवी बाईक, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

TVS Ronin 2025 Features price specifications : गोव्यात आयोजित मोटोसोल 4.0 या भव्य कार्यक्रमात टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांच्या नव्या टीव्हीएस रोनिन 2025 बाईकचे अनावरण केले.

Saisimran Ghashi

TVS Ronin 2025 Bike : गोव्यात आयोजित मोटोसोल 4.0 या भव्य कार्यक्रमात टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांच्या नव्या टीव्हीएस रोनिन 2025 बाईकचे अनावरण केले. या बाईकमध्ये डिझाईन, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवीन रंगसंगती

टीव्हीएस रोनिन 2025 मध्ये आता दोन नवीन आकर्षक रंगांचे पर्याय आहेत. ज्यामध्ये ग्लेशियर सिल्व्हर आणि चारकोल एंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नवीन रंगसंगती डेल्टा ब्लू आणि स्टारगेझ ब्लेज यांची जागा घेतील. याशिवाय बाईकला नवीन ग्राफिक्स आणि चांगल्या कनेक्टेड तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे ती अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसते.

खास वैशिष्ट्ये

यामध्ये 225cc सिंगल-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 20 bhp आणि 19.9 Nm टॉर्क निर्माण करते. पाच-स्पीड गिअरबॉक्ससह ही बाईक यापूर्वीप्रमाणेच दमदार परफॉर्मेंस देईल.

सुरक्षेत वाढ ड्युअल-चॅनेल ABS

या बाईकच्या मिड व्हेरिएंटमध्ये आता ड्युअल-चॅनेल ABS या महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा ब्रेकिंग अधिक अचूक आणि सुरक्षित बनवतात. टीव्हीएसच्या म्हणण्यानुसार, या अपग्रेडमुळे सर्व व्हेरिएंट्समधील रंग, ग्राफिक्स आणि परफॉर्मेंसमध्ये स्पष्ट फरक जाणवतो.

प्रवासासाठी उत्तम स्टोरेजचा पर्याय

टीव्हीएसने GIVI या मोटरसायकल लगेज सिस्टीम उत्पादक कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या सहकार्यामुळे रोनिनसाठी कस्टम फ्रेम्स आणि माउंट्स तयार करण्यात येतील, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या सामानासोबत प्रवास करणे सोपे होईल. स्टाईल आणि फंक्शनलिटीला जपत वेगवेगळ्या राइडिंग स्टाईल्ससाठी योग्य अशी लगेज उत्पादने उपलब्ध करून दिली जातील.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या मते, या भागीदारीचे उद्दिष्ट रायडर्सना अधिक सोयीस्कर आणि आरामदायक अनुभव देण्याचे आहे. डिझाईनमधील नावीन्य आणि दैनंदिन वापरातील सोय यांची सांगड घालून, रोनिन 2025 एक परिपूर्ण पर्याय आहे.

टीव्हीएस रोनिन 2025 आता अधिक सुरक्षित, स्टायलिश आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनली असून, राइडिंगचा अनुभव आणखी अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT