Twitter Blue Tick esakal
विज्ञान-तंत्र

Twitter Blue Tick : ट्विटरनं बंद केली ब्ल्यू टिक; विराट, धोनी ते बिग बींपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा यादीत समावेश

ट्विटर युजर्ससाठी ही मोठी बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनं लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहे.

Twitter Blue Tick : ट्विटर युजर्ससाठी ही मोठी बातमी आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनं लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून व्हेरिफाईड अकाऊंट्सवरून फ्री ब्ल्यू टिक्स काढून टाकण्यास सुरुवात झालीये.

या सेवेसाठी ज्या वापरकर्त्यांनी पैसे मोजले नाहीत अशांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढण्यात आल्या आहेत. याचा फटका अनेक सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांना बसला आहे.

दरम्यान, ट्विटर विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली होती. ज्या अकाऊंटधारकांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही, त्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढणार असल्याचं जाहीर करत यासाठी युजर्सला 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी मध्यरात्री संपली.

त्यानंतर ट्विटरनं ब्ल्यू टिक काढण्यास सुरुवात केली. त्यामुळं अनेक व्हेरिफाईट युजर्सच्या ब्ल्यू टिक आता बंद झाल्या आहेत. यात क्रिकेटर विराट कोहली, एम. एस. धोनी, सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटच्या ब्ल्यू टिक्स काढून काढण्यात आल्या आहेत.

तसेच एखाद्या व्यक्तीला ब्ल्यू टिक हवी असेल तर त्यासाठी त्याला ट्विटरला पैसे द्यावे लागणार आहेत. ज्या व्यक्ती किंवा संस्था पैसे मोजतील त्यांनाच फक्त ट्विटर ब्ल्यू टिक देण्यात येणार आहे. ट्विटरनं 2009 मध्ये ब्ल्यू टिक देण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT