twitter data breach data of 400 million twitter users leaked
twitter data breach data of 400 million twitter users leaked  Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter Data Leak : ट्विटरच्या 40 कोटी वापरकर्त्यांचा डेटा लीक! हॅकरने दिली 'ही' ऑफर

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सुमारे 40 कोटी वापरकर्त्यांचा डेटा चोरी झाला आहे. हा डेटा हॅकरने चोरला असून डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांची नावे, ईमेल आयडी, फॉलोअर्सची संख्या आणि वापरकर्त्यांचे फोन नंबर देखील समाविष्ट आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेटा लीकमध्ये भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि यूएस स्पेस एजन्सी नासा (NASA) यांच्या खात्यांच्या डेटाचा देखील समाविष्ट आहे. याआधी ट्विटरच्या सुमारे 54 लाख वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा लीक झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी सलमान खान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, स्पेस एक्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) इत्यादीसारख्या हाय प्रोफाइल लोकांच्या खात्यांचा डेटा देखील चोरला आहे. हॅकरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ट्विटर किंवा इलॉन मस्क, जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, तर तुम्हाला आधीच 54 मिलीयन वापरकर्त्यांच्या डेटा लीकसाठी जीडीपीआरकडून दंडाचा धोका आहे. आता 40 मिलीयन वापरकर्त्यांच्या डेटा लीक झाल्यानंतर बसणाऱ्या दंडाबद्दल विचार करा.

हॅकरने चोरलेला डेटा मध्यस्थामार्फत विकण्याची ऑफर दिली आहे. हॅकर म्हणतो की तो एका मध्यस्थामार्फत व्यवहार करण्यास तयार आहे. त्याने हा डेटा विकण्याची ऑफर दिली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एपीआयमध्ये असलेल्या काही त्रुटीमुळे डेटा लीक होऊ शकतो. नुकतेच ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख योएल रॉथ यांनी मस्कच्या नेतृत्वाखाली ट्विटरला असुरक्षित म्हटले होते आणि वापरकर्त्यांच्या डेटा धोक्यात असल्याचा इशारा देखील दिला होता. सुरक्षेची काळजी घेण्यासाठी कंपनीकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

यापूर्वी, लीक झाल्यानंतर ट्विटरच्या सुमारे 5.4 मिलीयन किंवा 54 लाख वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. री-स्टोअर प्रायव्हसीच्या रिपोर्टनुसार या वर्षी 2022 मध्ये यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. हा डेटा लीक त्याच बगमुळे झाला होता ज्यासाठी ट्विटरने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत झिरिनोव्स्की (zhirinovskiy) नावाच्या हॅकरला $ 5,040 दिले होते. हॅकरने हा डेटा हॅकर्स फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. दरम्यान या डेटा लीकमध्ये युजर्सचे पासवर्ड देण्यात आले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT