Twitter Sign Up eSakal
विज्ञान-तंत्र

Twitter : आता ट्विटर वापरण्यासाठी अकाउंट बनवणं अनिवार्य; इलॉन मस्कचा मोठा निर्णय

आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे.

Sudesh

टेस्ला आणि स्पेस एक्स या मोठ्या कंपन्यांचे संस्थापक इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर कायम चर्चेत राहिलं आहे. आता इलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे. (Twitter Sign Up)

यामुळे आता तुमचं जर ट्विटर अकाउंट नसेल, तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. (Elon Musk Decision)

तात्पुरती उपाययोजना

इलॉन मस्क म्हणाले, की "आमच्या डेटाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट होत होती, की सामान्य यूजर्ससाठी ही अत्यंत मानहानीकारक सेवा होती. एआयचं काम करणाऱ्या जवळपास सर्व कंपन्या, स्टार्टअप आणि मोठमोठ्या संस्था देखील मोठ्या प्रमाणात डेटा स्क्रॅप करत होत्या. यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे."

ट्विटरचा डेटा चोरून आपल्या एआय चॅटबॉटना ट्रेन करणाऱ्या या कंपन्यांविरोधात आपण कोर्टातही जाणार असल्याचं इलॉन म्हणाले. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये ही कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासंबंधी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना मस्क यांच्या वकीलाने पत्रही लिहिल्याचं सांगण्यात येतंय.

ट्विटरचं होऊ शकतं नुकसान

तज्ज्ञांच्या मते, ट्विटरचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटू शकतो. कारण, सार्वजनिकरित्या खुलं असल्यामुळे सर्च इंजिन अल्गोरिदम ट्विटरच्या लिंक्सना मोठ्या प्रमाणात रँक करत होते. तसेच, कित्येक न्यूज पोर्टल आणि इतर वेबसाईट ट्विट्सच्या लिंक एम्बेड करत होते. मात्र, आता ट्विटर जर सर्वांसाठी खुलं नाहीये, तर या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT