twitter banned more than 50000 indian account know details here  google
विज्ञान-तंत्र

#TwitterDown : 'जीमेल'पाठोपाठ ट्विटरही डाऊन; सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस

सकाळ डिजिटल टीम

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरचा सर्व्हर आज पुन्हा डाऊन झाल्याचे समोर आले. रविवारी सायंकाळी 7 वाजता काही युजर्सनी याबाबत तक्रार केली. भारतात संध्याकाळी 7 वाजता, तब्बल 1,747 लोकांनी DownDetector वेबसाइटवर Twitter वापरण्यात आडचणी येत असल्याचे नोंदवले.

याआधी शनिवारी गुगलची 'जीमेल'ची सेवा काही काळासाठी प्रभावित झाली होती. यादरम्यान अनेक यूजर्सनी सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार केली होती. Gmail च्या अॅप आणि डेस्कटॉप दोन्ही व्हर्जन्सवर अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

अनेक युजर्सनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रार नोंदवली होती, त्यानुसार त्यांना ट्विटर ऍक्सेस करण्यात अडचणी येत होत्या. त्याला ट्विट करण्यात आणि ट्विट पाहण्यातही त्रास होत होता.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

फेब्रुवारीमध्ये ट्विटर दोनदा ठप्प

फेब्रुवारी 2022 मध्येही ट्विटरच्या सेवा आठवड्यात दोनदा ठप्प झाल्या होत्या, यावेळीही अनेक यूजर्सला ट्विटर वापरताना अडचण येत होती. युजर्सच्या मते, अॅप ओपन केल्यावर त्यांना 'Something Went Wrong. Try Reloading' असा मॅसेज दिसत होता.

दरम्यान आज ट्विटर वापरकर्त्यांना अडचणी आल्यानंतर लगेच काही वेळात ट्विटरवर याबद्दल मीम्सचा पाऊस सुरू झाला. यूजर्सनी अनेक मजेशीर मीम्स शेअर केल्या आहेत. तर अनेकांनी नुकतेच ट्विटरचे मालक झालेल्या इलॉन मस्क यांच्यावर देखील निशाणा साधला.

इलॉन मस्क जेव्हा ट्विटर डाउन होते तेव्हा ट्विटर दुरुस्त करताना असं म्हणतं एखा यूजरने इलॉन मस्क यांची मीम शेअर केली आहे.

ट्विटर डाऊन आहे याबद्दल ट्विटरवर शोध घेणाऱ्यांवर देखील मीम्स शेअर करण्यात आल्या आहेत.

मी जेव्हा ट्विटर डाऊन होतं राधे नावाच्या एका ट्विटर युजरने मोदींच्या व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बऱ्याच वापरकर्त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांच्याबद्दलच्या मीम्स शेअर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT