नवी दिल्ली : ट्विटचा स्क्रीनशॉट काढून तो स्नॅपचॅटवर शेअर करावा लागण्याच्या त्रासापासून आता मुक्ती मिळणार आहे. कारण आता या त्रासाला ट्विटरने आपल्या नव्या अपडेटने रामराम ठोकला आहे. आता आपण आपले ट्विट डायरेक्ट स्नॅपचॅटवर शेअर करु शकता. कारण आता स्नॅपचॅट आणि ट्विटरने एकमेकांना सपोर्ट दिला आहे.
आतापर्यत तर ट्विटर युझरला आपले ट्विट स्नॅपचॅटवर शेअर करण्यासाठी त्या ट्विटचा स्क्रीनशॉट काढूनच तो शेअर करावा लागत असे. मात्र, आतापासून ही नसती उठाठेव बंद होणार आहे. आता युझरला ट्विट शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा ऑप्शन प्राप्त होणार आहे. सध्यातरी हा ऑप्शन फक्त आयओएस युझरसाठीच आहे. मात्र लवकरच तो सर्वांसाठीच उपलब्ध होणार आहे.
हे नवे अपडेट तर आले आहे, मात्र यासोबत एक अटदेखील आहे. ती अट अशी आहे की आपण त्याच ट्विट्सना शेअर करु शकता जे ट्विट्स पब्लिक आहेत. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट ट्विटला आपण स्नॅपचॅटवर शेअर करु शकत नाही. जर आपल्याला एखादे ट्विट स्नॅपचॅटवर शेअर करायचे असेल तर ट्विटच्या खालील शेअर बटनवर क्लिक करुन स्नॅपचॅटच्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. यानंतर आपण आपलं ट्विट स्नॅपचॅटच्या स्टोरीजमध्येही शेअर करु शकता. ट्विटरने म्हटलंय की, लवकरच या फिचरला ते इन्स्टाग्रामसाठीही लागू करणार आहेत. ट्विटरने केलेल्या या सुलभतेमुळे अनेकांच्या डोक्याचा ताप वाचला आहे. यामुळे युझर्स खुश असल्याचं दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.