Uber Travel service: वाहतूक सुविधा पुरवणारी कंपनी उबरने आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन फीचर्स आणले आहे. याद्वारे प्रवाशांना हाय-सिक्योरिटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उबरच्या नवीन सिक्योरिटी फीचरमध्ये आधीच्या तुलनेत अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. नवीन सिक्योरिटी फीचरमध्ये रियर सीट बेल्ट रिमाइंडर, प्रोअॅक्टिव्ह ट्रिप अॅनोमली डिटेक्शनसह SOS ची सुविधा देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर यात RideCheck ३.० सारखी सुविधा देण्यात आली आहे. याद्वारे प्रवास करताना विनाकारण गाडी थांबल्यास चालक आणि प्रवासी दोघांना कॉल केला जाईल. कॉलवर प्रवाशांना सर्वकाही व्यवस्थित असल्यानंतरच पुढील प्रवास सुरू होईल. विशेष म्हणजे ही सुविधा २४×७ सुरू राहील.
सहज करता येईल तक्रार
कंपनीने माहिती दिली की, कोणतीही तक्रार करायची असल्यास २४ तास मदत मिळेल. कोणत्याही मदतीसाठी प्रवासी ८८००६८८६६६ या क्रमांकावर कॉल करू शकता. कंपनीचा दावा आहे की, ९९ टक्के इनकमिंग कॉलचे उत्तर ३० सेकंदाच्या आत दिले जाईल.
SOS ची सुविधा
कोणत्याही प्रवासाआधी चालक आणि प्रवाश्याला फोनवर पुश नॉटिफिकेशनसह ऑडिओ रियर सीट बेल्ट रिमाइंडर दिले जाईल. उबरने ही सुविधा हैद्राबादमध्ये आधीच सुरू केली आहे. आता कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा सुरू करत आहे.
प्रवाशांना सहज सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने सेफ्टी टूलकिटला डिझाइन करण्यात आले आहे. सेफ्टी टूलकिटमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याद्वारे तक्रारींचे निवारण सहज करता येईल. ८८००६८८६६६ या क्रमांकावर कॉल करून २४ तास या सेवेचा फायदा घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.