TikTok Esakal
विज्ञान-तंत्र

TikTok : टाईमपास करून कमवा पैसे! 'ही' कंपनी देतेय एक तास व्हिडिओ पाहण्याचे तब्बल ८ हजार रुपये

सोशल मीडियावरील टाईमपास आता तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो.

Sudesh

सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडिओ पाहत असताना वेळ कसा जातो हे आपल्याला कळतच नाही. इन्स्टाग्रामवरील रील्स किंवा यूट्यूबवरील शॉर्ट्स एकदा सुरू झाले की संपता संपत नाहीत. या नादात आपला बराच वेळ वाया जातो. मात्र, हाच टाईमपास आता तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो. कारण असे व्हिडिओ पाहण्यासाठी एक कंपनी एका तासाचे तब्बल आठ हजार रुपये देणार आहे.

युबिक्विट्स (Ubiquitous) नावाच्या कंपनीने ही घोषणा केली आहे. जे व्यक्ती सलग दहा तास टिकटॉक व्हिडिओ पाहतील, त्यांना एका तासाचे १०० डॉलर्स म्हणजेच सुमारे ८,२०० रुपये देण्यात येणार आहेत. ऑनलाईन जगतात काय ट्रेंड सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी कंपनीने (Company to pay 100 dollars per hour to watch TikTok) ही ऑफर दिली आहे.

असं करा अप्लाय

याठिकाणी अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला युबिक्विट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यानंतर तुम्ही या कामासाठी कसे योग्य आहात, हे थोडक्यात लिहून कंपनीला पाठवावे लागणार आहे. केवळ १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात.

दहा तास व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सहभागी व्यक्तींना आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करावा लागणार आहे. हे करताना त्यांना या कंपनीला टॅग करायचं आहे. जे लोक यामध्ये सहभागी होतील, त्यांपैकी तीन जणांची निवड कंपनी करणार आहे. यासाठीची डेडलाईन ३१ मे आहे. त्यानंतर ७ जून रोजी कोणाची निवड करण्यात आली याबाबत कंपनी घोषणा करेल.

ही ऑफर केवळ टिकटॉक (TikTok) पाहणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असेल. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओंना ग्राह्य धरण्यात येणार नाही. यासाठी तुम्ही सोशल मीडिया तज्ज्ञ असण्याची गरज नाही. आपण साधारण टिकटॉक यूजर्सना गृहित धरून ही स्कीम लाँच केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टिकटॉक सध्या जगातील चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्क आहे. न्यूजवीकने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील तरुण दररोज सरासरी ११३ मिनिटं या अ‍ॅपवर असतात. दरम्यान, टिकटॉक हे चिनी कंपनी बाईट डान्सच्या मालकीचे असल्यामुळे भारत सरकारने यावर बंदी लागू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT