Upcoming Car 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Car 2024 : किआ कार्निवल फेसलिफ्टचं डिझाईन बघून नक्कीच वेडे व्हाल, जाणून घ्या कधी लॉन्च होणार ?

तुम्हालाही Kia Carnival आवडत असेल तर आता या कारचे फेसलिफ्ट व्हर्जनही येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Car 2024 : तुम्हालाही Kia Carnival आवडत असेल तर आता या कारचे फेसलिफ्ट व्हर्जनही येणार आहे. ही कार पुढील महिन्यात जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली जाईल परंतु त्यापूर्वी या कारचे फेसलिफ्ट मॉडेल अनावरण करण्यात आले आहे. 2024 Kia Carnival Facelift चे डिझाईन खूपच छान दिसत आहे, नवीन कार्निवलमध्ये काय बदल होतील ते बघुया.

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर नवीन Kia कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलच्या समोर L-shaped LED DRLs देण्यात आले आहेत. नवीन हेडलाइट्स उभ्या ठेवल्या आहेत तर समोरच्या रेडिएटर ग्रिलला पूर्वीपेक्षा मोठे केले आहे.

बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, आता या MPV मध्ये तुम्हाला फंकी डिझाइनसह नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतील. मागील बाजूच्या टेललाइट्स एल-आकाराच्या विस्तारित डिझाइनसह आणल्या गेल्या आहेत.

फीचर्स

Kia च्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये 14 मानक ड्रायव्हर असिस्टंट फीचर्स, स्लाइड-फ्लेक्स सीटिंग सिस्टम, 12.3-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, नेव्हिगेशन आधारित स्मार्ट क्रूझ कंट्रोल, हायवे ड्रायव्हिंग असिस्ट, स्मार्ट पॉवर टेलगेट आणि वायरलेस फोन चार्जर आहे.

2024 Kia कार्निवल फेसलिफ्ट लॉन्च : भारतात कधी लॉन्च होईल?

Kia Carnival चे फेसलिफ्ट मॉडेल पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च केले जाऊ शकते. पूर्वीप्रमाणे या कारला 2.2 लीटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते जे 199bhp पॉवर आणि 440Nm टॉर्क जनरेट करेल. यासोबत ही कार 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च केली जाऊ शकते.

2024 किआ कार्निवल फेसलिफ्ट किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या एमपीव्हीची किंमत पूर्वीपेक्षा जास्त असेल. सध्या कंपनीने कंपनीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT