Upcoming Smartphones 2022
Upcoming Smartphones 2022  
विज्ञान-तंत्र

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होतील 'हे' स्मार्टफोन, पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Smartphones 2022 list : जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडी वाट पाहणे फायदेशीर ठरणार आहे कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात आणि जागतिक स्तरावर अनेक नवीन दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. Vivo, Xiaomi आणि iQOO सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होतील. Xiaomi च्या फोनसोबत 120W चार्जिंग उपलब्ध होणार आहे, तर Vivo च्या फोनला iPhone 13 सीरीज आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा सारखे डिझाइन मिळणार आहे.

Realme GT 2 सीरीज

Realme GT 2 सीरीज 4 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे. ही सीरीज Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केली जाईल. कंपनीने त्याच्या डिझाइनची माहिती दिली आहे. त्यामध्ये असे म्हटले जाते की, या सीरीजचे डिझाइन हे अद्वितीय असेल आणि यात अल्ट्रा वाइड बँड हायपरस्मार्ट अँटेना स्विचिंग सिस्टम मिळेल, जी ग्राहकांना 360 डिग्री कनेक्टिव्हिटी देईल. Realme GT 2 Pro मध्ये ट्रिपल रीअर कॅमेऱ्यासह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आणि 12 GB पर्यंत RAM मिळेल.

iQOO 9 सीरीज

iQOO 9 सीरीज 5 जानेवारी 2022 रोजी लॉन्च होणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरस देखील या iQOO 9 सीरीज मध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, फोनला 120Hz रिफ्रेश रेटसह 2K AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनचे एक प्रो मॉडेल देखील असेल ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असेल.

Vivo V23 सीरीज

Vivo V23 सीरीज देखील भारतात 5 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo V23 आणि Vivo V23 Pro सारखे स्मार्टफोन लॉन्च केले जातील. Vivo ने फोनबद्दल कोणतीही खास माहिती दिलेली नाही, पण समोर आलेल्या टीझरनुसार फोनमध्ये Dimensity 1200 प्रोसेसर मिळेल. याशिवाय, iPhone 13 सीरीज प्रमाणे फ्लॅट एज डिझाइन देण्यात येईल आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. हा फोन 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi 11i हायपरचार्ज

Xiaomi 11i हायपरचार्जबद्दल सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. हा फोन भारतात 6 जानेवारी 2022 ला लॉन्च होणार आहे. यामध्ये तुम्हाला 120W फास्ट चार्जिंग देण्यात येईल, कंपनीचा दावा आहे की फोन फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. Xiaomi 11i ला हायपरचार्जसह 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल आणि 108-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT