Upcoming SUV esakal
विज्ञान-तंत्र

Upcoming SUV : या वर्षात येणार 5 नवीन SUV होणार

भारतात हल्ली बजेट एसयुव्ही गाड्यांची क्रेझ

सकाळ डिजिटल टीम

Upcoming SUV : भारतात हल्ली बजेट एसयुव्ही गाड्यांची क्रेझ निघाली आहे. हे गाड्यांचं मार्केट बघून वाहन निर्मात्या कंपन्या देखील एसयुव्ही बनविण्याच्या तयारीत आहेत. मिडसाईज एसयुव्ही सेगमेंटमध्ये या वर्षी पाच जबरदस्त गाड्या लाँच होणार आहे. टाटा, होंडासह किया सारखा ब्रँड एसयुव्ही सादर करणार आहे.

Citroen C3 Aircross: सिट्रॉन सी 3 एअरक्रॉसचा ग्लोबल प्रीमियर या महिन्याच्या शेवटी होईल. भारतात या कारची विक्री 2023 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिट्रॉनची नवीन एसयुव्ही पाच आणि सात सीटर पर्यायांसह सादर केली जाऊ शकते.

Honda Midsize SUV : होंडा भारतात नवीन मध्यम आकाराची एसयुव्ही लाँच करण्याचा विचार करत आहे. आगामी 5 सीटर एसयुव्ही जुलै किंवा ऑगस्ट दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. या गाडीचं डिझाईन होंडाच्या ग्लोबल एसयूव्ही सारखी असेल.

Kia Seltos Facelift : किया सेल्टोसच्या फेसलिफ्ट मॉडेलची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आगामी मॉडेल नवीन अपडेट्ससह सादर केले जाऊ शकते. सध्या या कारचा समावेश देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये झाला आहे.

Tata Harrier Facelift: Tata Harrier चे अपडेटेड मॉडेल देखील लवकरच लाँच केले जाऊ शकते. टाटाच्या लोकप्रिय कारचे फेसलिफ्टेड व्हर्जन अनेक अपडेट्ससह सादर केले जाईल. कंपनी त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लाँच करण्याच्या तयारीत आहे.

टाटा मोटर्स सफारी एसयूव्हीची फेसलिफ्ट आवृत्ती देखील सादर करू शकते. टाटा सफारीला भारतात खूप पसंती दिली जात आहे. आता फेसलिफ्ट आवृत्तीच्या आगमनानंतर त्याच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT