Aadhar QR App esakal
विज्ञान-तंत्र

Aadhar QR App : घरबसल्या काही मिनिटांत करा आधार अपडेट! UIDAI च्या नव्या QR कोड बेस्ड अ‍ॅपची एन्ट्री, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर..

UIDAI लवकरच QR कोड बेस्ड नवं अ‍ॅप लाँच करणार आहे. घरबसल्या काही मिनिटांत आधार अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Saisimran Ghashi

आधार कार्डशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच एक नवं QR कोड बेस्ड अ‍ॅप लाँच करणार असून, याद्वारे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या केवळ काही मिनिटांतच आधार अपडेट करता येणार आहे.

आजवर नागरिकांना पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख यांसारख्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागत होते. मात्र, UIDAI च्या या नव्या अ‍ॅपमुळे ही गरज पूर्णपणे संपणार आहे. आता मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या ही सर्व माहिती अपडेट करू शकाल.

अ‍ॅपमध्ये काय असणार खास?

UIDAI चं हे नवं अ‍ॅप QR कोड बेस्ड असून, यामध्ये अनेक नवे फिचर्स असणार आहेत:

  • QR कोडद्वारे डिजिटल आधार शेअर करण्याची सुविधा

  • फोटोकॉपीची गरज नाही, डिजिटल डॉक्युमेंट्सवरच काम

  • Masked Aadhaar शेअर करता येणार

  • App-to-App आधार ट्रान्सफर ची सुविधा

  • हॉटेल, ट्रेन किंवा कोणत्याही सेवा पुरवठादाराला त्वरित आधार ऑथेंटिकेशन

नोव्हेंबर 2025 पासून नवी सुविधा पूर्णपणे कार्यान्वित

UIDAI कडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2025 पासून हे अ‍ॅप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर नागरिक घरबसल्या पत्ता, नाव, बायोमेट्रिक माहिती, मोबाईल नंबर अशा सर्व बाबी अपडेट करू शकतील.

इतर कागदपत्रांशी लिंक होणार

या नव्या प्रणालीत आधारला इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशी लिंक करण्याचाही पर्याय असणार आहे. यात जन्म प्रमाणपत्र, मॅट्रिक सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर, वीज बिलाची माहिती देखील जोडण्याची तयारी UIDAI करत आहे.

संपूर्ण आधार अपडेट प्रक्रिया केवळ काही मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा UIDAI ने केला आहे. त्यामुळे लांबच लांब रांगा, प्रतीक्षा, आणि वेळ वाया जाणं हे सगळं आता भूतकाळात जमा होणार आहे.

ही नवी सुविधा सुरू झाल्यानंतर आधार संबंधित व्यवहार अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होतील. UIDAI चं हे अ‍ॅप डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIP ताफ्यापेक्षा जीव मौल्यवान; पुणे ट्रॅफिक पोलिसांचं कौतुकास्पद पाऊल, थेट CM देवेंद्र फडणवीसांचा ताफा थांबवला

पोलिसांनी तब्बल 10 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त; अभियंता, विदेशी, दंतवैद्यकीय विद्यार्थ्यासह 7 जणांना अटक, कुठून खरेदी करायचे ड्रग्ज?

Bhima River: 'पाऊस थांबला अन्‌ सीनेतील विसर्गही घटला'; भीमा नदीत १ लाख २५ हजार क्युसेकने पाणी

Arabian Sea Weather : अरबी समुद्राच्या वातावरणात पुन्हा बदल, वादळसदृश स्थिती; हवामान विभागाचा अंदाज काय?

Barshi Crime: 'बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून ३० जनावरांची सुटका'; ४ मृत्युमुखी, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT