the use of parenteral control for smartphones useful for people 
विज्ञान-तंत्र

मुलांच्या हातात स्मार्टफोन देताय? परेंटल कंट्रोलमुळे आक्षेपार्ह गोष्टीपासून राहतील दूर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लहान मुलांचे मन खूप कोवळे असते. त्यांना लहान सहान कोणत्याही गोष्टींचा लगेच फरक जाणवतो. आजकाल ज्याप्रमाणे लहान मुलांमध्ये स्मार्टफोन वापरण्याची सवय त्यांना लागली आहे की, नेमक आपण हे बघायला विसरतो की ते स्मार्टफोनचा कश्याप्रकारे वापर करत आहेत.

जर आपल्याजवळ स्मार्टफोन असेल आणि आपल्या मुलांनी स्मार्टफोनच योग्य पद्धतीने वापर करावा, तसेच त्यांना कोणतीही वाईट सवय लागू नये असे वाटत असेल तर आपण स्मार्टफोन वर परेंटल  कंट्रोल पण लावू शकता. तर आज आम्ही तुम्हाला त्याचंबद्दल काही टिप्स देणार आहोत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना निःसंकोचपणे स्मार्टफोन्स वापरायला देऊ शकता.
  
बऱ्याचदा असे होते की, लहान मूल गुगल प्ले स्टोअरवरून एखादे चुकीचे अॅप किंवा एखादा चित्रपट डाऊनलोड करतात. एखादेवेळी हे चुकीचे अॅप आपल्या स्मार्टफोन मधील आपली सर्व गोपनीय माहिती चोरी करू शकते, त्यामुळे
पॅरेंटल कंट्रोल लागू करणे खूप गरजेचे आहे.
    
परेंटल  कंट्रोल स्मार्टफोनला लागू करणे खूप सोपे आहे


1. पहिल्यांदा गूगल प्ले स्टोअरवर जायचे.
2. त्यानंतर वर दिसणाऱ्या तीन बार्सवर क्लिक करणे.
3. तिथून सेटिंग्ज मध्ये जाणे, आणि तिथे जाऊन आपल्याला परेंटल कंट्रोल सिलेक्ट करायचे आहे.
4. परेंटल कंट्रोल चालू करून, चालू केल्यानंतर तिथे एक पिनकोड मागितला जाईल, तिथे तुम्हाला जो योग्य वाटेल तो चार अंकी पिनकोड आपल्या मुलांना न कळता द्यायचा आहे.
5. त्यानंतर तुमच्या समोर जी स्क्रीन खुली होईल तिथे तुम्ही सर्व प्रकारची बंधन लागू करू शकता, कोणत्या प्रकारचे चित्रपट तसेच अॅप्स आपल्या मुलांसाठी योग्य आहेत ते तुम्ही ठरवू शकता.

अशा स्थितीत आपली मुलं डाऊनलोड करण्यापासून सावध राहतील, आणि परेंटल कंट्रोलमुळे आपल ही समाधान होईल. जर मुलांना मोबाईल मध्ये असलेल्या अॅप वापरण्यापासून थांबवायचे असेल तर,

आता आपण नवीन काही डाऊनलोड करू नये म्हणून परेंटल  कंट्रोल लागू केलं पण मुलांच्या मोबाईलमध्ये आधीपासूनच असलेल्या अॅप वापरण्यापासुन थांबवायचे असेल तर आपण त्यांना या पद्धतीने थांबवू शकतो. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन युजर्स ऑपशनवर क्लीक करून तिथे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिसेल. त्यामधे जाऊन गेस्ट युजर अॅड केल्यानंतर पिन मागितला जातो. तिथे पिन टाल्यानंतर मुलांसाठी एक स्पेसिफिक युजर चालू करावे. त्यामुळे मुले अॅप आणि इतर डॉक्युमेंट्स मुल बघु शकतात. त्याचबरोबर स्क्रीन टाईम लावू शकतो. जर आपल्या फोनमध्ये फेस लॉकची फिचर असेल तर तिथेही तुम्ही सेटिंग्ज लावू शकता. त्यामुळे मुले अस काही बघणार नाहीत आणि त्यांच्यावर वेगळा असर पडणार नाही, त्यामध्ये तुम्ही इंटरनेट चालू करण्यावर ही कंट्रोल करू शकता. जर तुम्हाला क्रोम ब्राऊझरवर ही अशी सेटिंग्ज कंट्रोल करायची असेल तर ऑथोराइज्ड पेरेंटेल कंट्रोल ॲप डाऊनलोड करू शकता. हे खूप वापरण्यासाठी योग्य असे माता पितांसाठी सुविधा उपलब्ध करून देणारे उपयोगी असे ॲप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT