NPCI Hello UPI eSakal
विज्ञान-तंत्र

NPCI Hello UPI : 'हॅलो यूपीआय..' आता केवळ फोन कॉल करून पाठवता येतील पैसे; इंटरनेटचीही नाही गरज

UPI on Call : यूपीआय सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता NPCI ने एक नवीन फीचर लाँच केलं आहे.

Sudesh

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातील UPI पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. केवल भारतातच नाही, तर जगभरातील कित्येक देशांमध्ये आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता NPCI ने एक नवीन फीचर लाँच केलं आहे.

आता यूजर्सना केवळ फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेटचीही गरज नसेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबत घोषणा केली. यासोबतच, यूपीआयबाबत आणखी नवे फीचर्स देखील यावेळी लाँच करण्यात आले.

हॅलो यूपीआय

Hello! UPI हे फीचर एनपीसीआयने लाँच केलं आहे. या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी यूजर्सना आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ग्राहक एका ठराविक नंबरवर कॉल करू शकता. यासाठी विविध बँकांसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर कॉल करुन, आपल्या बँकेचं नाव सांगावं लागणार आहे. सोबतच, ट्रान्झॅक्शनचा प्रकार सांगून, शेवटी यूपीआय PIN च्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकणार आहात.

ही सुविधा सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच यात अन्य भाषादेखील येतील, असं एनपीसीआयने स्पष्ट केलं. या प्रकारच्या पेमेंटसाठी एआयचा वापर देखील करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. सध्या हॅलो यूपीआयच्या माध्यमातून केवळ 100 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत.

आणखी फीचर्स लाँच

यासोबतच यूपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लाँच करण्यात आलं आहे. या माध्यमातून यूजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकतं. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच 'लाईट एक्स' नावाचं आणखी एक प्रॉडक्ट NPCI ने लाँच केलं आहे. इंटरनेट शिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT