Gmail Sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : मेलचे मोबाइलवरही करता येणार भाषांतर

गुगल बार्ड’ सादर केल्यापासून कंपनी वापरकर्त्यांसाठी नवनवे अपडेट देण्यावर भर देत आहे. गुगलने आता ‘जीमेल अ‍ॅप’साठी भाषांतराचे फीचर आणले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

गुगल बार्ड’ सादर केल्यापासून कंपनी वापरकर्त्यांसाठी नवनवे अपडेट देण्यावर भर देत आहे. गुगलने आता ‘जीमेल अ‍ॅप’साठी भाषांतराचे फीचर आणले आहे. यापूर्वी केवळ वेबसाठी असलेले हे फीचर गुगलने मोबाइलसाठीही सादर केल्याने वापरकर्त्यांना आता कुठेही, कधीही मेलचा भाषांतर करणे सहज शक्य होणार आहे. अ‍ॅण्ड्राइड, आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमसाठी हे फीचर काम करेल.

काय आहे फीचर?

  • सर्च इंजिन गुगल तब्बल १०० भाषांमध्ये भाषांतराची सुविधा देते. त्यामुळे जीमेल वेबवर (संगणकासाठी) मेलचे भाषांतर करण्याचे फीचर वापरकर्त्यांना उपलब्ध होत होते. मात्र, हेच फीचर मोबाइल अ‍ॅपसाठी मिळत नव्हते, परंतु नव्या अपडेटमध्ये गुगलने हे फीचर मोबाइलसाठीही रोलआउट केले आहे.

  • वापरकर्त्यांना आलेला मेल त्यांनी निवड केलेल्या भाषेत भाषांतरित करता येणार आहे. त्यासाठी आलेल्या मेलच्या वरील बाजूस ‘ट्रान्स्लेट’ हा बॅनर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर संपूर्ण मेल निवड केलेल्या भाषेत भाषांतरित होईल.

  • उदा. वापरकर्त्याला एखादा मेल इंग्रजीमध्ये आलेला असेल. तर, तो मेल त्याने निवडलेल्या मराठी किंवा हिंदी व अन्य कोणत्याही भाषेत भाषांतरित करता येईल.

  • याशिवाय वापरकर्त्यांना हे फीचर बंददेखील करता येईल. तसेच हा पर्याय कस्टमाइजही करता येईल.

कसे वापराल फीचर?

  • प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरमधून अ‍ॅप अपडेट करा

  • अपडेटनंतर आलेल्या इ-मेलच्या वरील बाजूस ‘ट्रान्स्लेट टू ...’ हा पर्याय दिसेल

  • ‘ट्रान्स्लेट टू...’ या पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण इमेल तुम्ही निवडलेल्या भाषेत भाषांतरित होईल.

  • यात ऑटो ट्रान्स्लेटचा पर्यायही उपलब्ध आहे.

  • हा पर्याय निवडल्यास प्रत्येक मेल निवडलेल्या भाषेत भाषांतरित होईल.

कधी होणार उपलब्ध?

गुगलच्या ब्लॉगनुसार ॲण्ड्राइड वापरकर्त्यांसाठी हे फीचर ८ ऑगस्टपासून तर आयओएस वापरकर्त्यांसाठी २१ ऑगस्टपासून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. गुगल स्पेसच्या वापरकर्त्यांसह गुगल अकाउंट असलेल्या प्रत्येकाला हे फीचर उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT