BH Series esakal
विज्ञान-तंत्र

BH Series : कोणाला मिळते BH सिरीजची नंबर प्लेट? नेमकी काय असते ही सिरीज?

नंबर प्लेटवरून तुम्ही ही गाडी कोणत्या राज्यातली आहे हे ओळखू शकतात.

धनश्री भावसार-बगाडे

Vehicle BH Series : आतापर्यंत तुम्ही गाड्यांवर विविध प्रकारच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. राज्यांच्या नावानुसार वेगवेगळी नंबर प्लेट सिरीज असते. उदाहर्णार्थ गाडी ज्या राज्याची त्या राज्याच्या दोन अक्षरांची सिरीज असते. जसे महाराष्ट्राची MH, कर्नाटकाची KA, गुजरातची GJ अशा सिरीजच्या नंबर प्लेट तुम्ही पाहिल्या असतात.

पण कोत्याही प्रांताचा कोड नसलेला BH सिरीजचा कोड सुद्धा तुम्ही पाहिला असेल. मग हा BH कोड नेमका कोणासाठी असतो? कोणाला ही सिरीज मिळते? जाणून घेऊया.

BH नंबर प्लेटला भारत प्लेट म्हणतात. भारताच्या रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्रालयाने २८ ऑगस्ट २०२१ पासून भारत (BH) सिरीज नंबर प्लेट लाँट केली. ही प्लेट पूर्ण भारतात चालते.

जे लोक नोकरी, कामाच्या निमित्ताने सतत देशभर फिरत असतात, प्रवास करतात अशा लोकांसाठी ही BH सिरीज नंबर प्लेट फायदेशीर असते. कारण BHनंबर प्लेटमुळे वाहनांचे पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन ट्रांसफर करण्याची गरज भारणार नाही. यामुळे लोकांचा वेळ आणि खर्च वाचतो.

कोणाला मिळते ही सिरीज?

  • जे लोक संरक्षण क्षेत्रात म्हणजेत सैन्य किंवा नीमलष्करात काम करतात त्यांना BH सिरीज नंबर मिळू शकतो.

  • जे राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत.

  • ज्या खासगी कंपन्यांचे प्लांट देशातील किमान ४ राज्यांत किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ही सिरीज मिळू शकते.

कशी मिळवता येते?

  • BH सिरीज नंबर प्लेटसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

  • तुमची कागदपत्रे परिवहन अधिकाऱ्याकडून व्हेरीफाय करून घ्यावी लागतील.

  • MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर! पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ताजे भाव एका क्लिकमध्ये

China Pakistan partnership: चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाशात झेप; भारतावर लक्ष ठेवण्यासाठी १६ महिन्यांत सहा उपग्रह प्रक्षेपित?, अवकाशातून राहणार नजर

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! १५ जुलैला १२ स्थानके सुरू होणार, पण पूर्ण मेट्रोसाठी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार

SCROLL FOR NEXT