Miss AI Competition  eSakal
विज्ञान-तंत्र

Miss AI : जगातील पहिली 'मिस एआय' स्पर्धा, जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस; कोण करु शकतं रजिस्टर?

WAIC : जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक एआय इन्फ्लुएन्सर मॉडेल निवडण्यासाठी पहिल्यांदाच स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

Sudesh

AI Influencers : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय हा आता आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग होत आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांमध्येच संपूर्ण जग एआय-मय झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर देखील कित्येक 'एआय इन्फ्लुएन्सर्स'चे अकाउंट्स पहायला मिळत आहेत. या सगळ्यातच आता चक्क 'मिस एआय' स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

जगातील सौंदर्यवतींची स्पर्धा ही 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिवर्स' अशा नावांनी ओळखली जाते. मात्र आता जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक एआय इन्फ्लुएन्सर मॉडेल निवडण्यासाठी पहिल्यांदाच स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्सने (WAIC) या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

कुणाला करता येईल रजिस्टर?

या स्पर्धेमध्ये एआय मॉडेलला हँडल करणारा कोणताही क्रिएटर सहभागी होऊ शकतो. मात्र, त्यासाठी काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. एआय मॉडेलच्या क्रिएटरचं सोशल मीडिया अकाउंट असायला हवं आणि क्रिएटरचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असायला हवं या दोन मुख्य अटी आहेत. यातील एआय क्रिएटर्सना वेगवेगळ्या निकषांवर जज केलं जाईल.

काय असणार निकष?

या स्पर्धेमध्ये एआय मॉडेलची सुंदरता, संतुलन आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या गोष्टी तपासल्या जातील. सोबतच, या एआय मॉडेलची लोकप्रियता किती आहे, सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत हेदेखील पाहिलं जाईल.

काही प्रसिद्ध एआय इन्फ्लुएन्सर्समध्ये Aitana Lopez आणि Emily Pellegrini यांचं नाव घेता येईल. आयटानाचे सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत, तर एमिलीचे 2.81 लाख फॉलोवर्स आहेत.

किती असणार बक्षीस?

या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या एआय मॉडेलच्या क्रिएटरला 20 हजार डॉलर्स (सुमारे 16.7 लाख रुपये) किंमतीचं बक्षीस देण्यात येईल. यातील 5,000 डॉलर्स हे कॅश देण्यात येतील. तसंच मेंबरशिप प्रोग्राम, प्रमोशनल पॅकेज आणि पीआर सपोर्टच्या स्वरुपात इतर रक्कम देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT