Vivo T4x Mobile : विवो कंपनीने आपल्या T4 सिरीजमधील पहिला स्मार्टफोन Vivo T4x भारतात लॉन्च केला आहे. हा फोन मागील वर्षी आलेल्या Vivo T3x चा अपग्रेडेड व्हर्जन असून, दमदार बॅटरी, अत्याधुनिक प्रोसेसर आणि मिलिटरी ग्रेड मजबूती यांसारख्या खास फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Vivo T4x 5G च्या बेस व्हेरिएंटची (6GB RAM + 128GB स्टोरेज) किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB + 128GB व्हेरिएंट 14,999 रुपये तर टॉप व्हेरिएंट 8GB + 256GB स्टोरेज 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मार्च 12 पासून Flipkart, Vivo India e-store आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. खरेदीदरम्यान निवडक बँक कार्डांवर एक हजार रुपयांची विशेष सूट मिळणार आहे.
डिस्प्ले: 6.72-इंच Full-HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,050 निट्स ब्राइटनेस.
प्रोसेसर: MediaTek Dimensity 7300 SoC, दमदार परफॉर्मन्ससाठी.
स्टोरेज: LPDDR4X RAM आणि UFS 3.1 स्टोरेज, वेगवान मल्टीटास्किंगसाठी.
बॅटरी: 6,500mAh क्षमतेची बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह.
कॅमेरा: 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर, समोर 8MP सेल्फी कॅमेरा.
डिझाईन: MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन, IP64 रेटिंग (डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टंट).
ऑडिओ: ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स अधिक स्पष्ट आणि दमदार साउंडसाठी.
सॉफ्टवेअर: Android 15 वर आधारित FuntouchOS 15.
सुरक्षा: साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट.
कनेक्टिव्हिटी: 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB Type-C, GPS, GLONASS, Beidou सपोर्ट.
Vivo T4x हा भारतात 14 हजार रुपयांच्या किंमतीत मिलिटरी ग्रेड मजबूती असलेला पहिला स्मार्टफोन आहे. मोठी बॅटरी, वेगवान चार्जिंग, दमदार प्रोसेसर आणि उत्तम डिस्प्ले यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टीटास्किंग आणि फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. 12 मार्चला या फोनवर सेलमध्ये स्पेशल डिस्काउंट मिळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.