Vivo T3 Pro Discount Offer Flipkart Mobile Bonanza Sale esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Bonanza Sale : बजेट मोबाईल घ्यायचाय? Vivo T3 Pro फोनवर मिळतोय 6 हजारचा डिस्काउंट; दमदार बॅटरी जबरदस्त कॅमेरा अन् किंमत फक्त..

Vivo T3 Pro Discount Offer Flipkart Mobile Bonanza Sale : मोबाईल बोनांझा सेलमध्ये Vivo T3 Pro स्मार्टफोनवर तब्बल 6 हजार रुपयांची सूट मिळते आहे.

Saisimran Ghashi

Mobile Bonanza Sale Offers : जर तुम्ही नवीन आणि दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर Vivo ने ग्राहकांसाठी एक जबरदस्त संधी आणली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय मिडरेंज स्मार्टफोन Vivo T3 Pro च्या किमत कमी केली असून, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Mobile Bonanza सेलमध्ये हा स्मार्टफोन भल्यामोठ्या सवलतीसह मिळतो आहे.

6 हजार पर्यंतचा जबरदस्त डिस्काउंट

Vivo T3 Pro चा मूळ किंमत 24,999 रुपये होती. पण आता हा फोन 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच निवडक बँक कार्ड्सवर 4,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त सूट दिला जात आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन केवळ 18,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळते आहे.

हा डिस्काउंट फ्लिपकार्टच्या Mobile Bonanza सेलमध्ये मिळते असून, सेल २२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये Vivo T3 सीरिजमधील इतर मॉडेल्स जसे Vivo T3 Ultra आणि Vivo T3x यांच्यावरही सूट मिळत आहे.

Vivo T3 Pro चे आकर्षक फीचर्स

  • डिस्प्ले 6.77 इंचांचा Full HD+ AMOLED डिस्प्ले, वक्र डिझाइनसह. या डिस्प्लेची ब्राइटनेस क्षमता 4500 निट्स पर्यंत आहे, म्हणजेच सूर्यप्रकाशातसुद्धा स्पष्ट दृश्य.

  • प्रोसेसर Qualcomm Snapdragon 7 Gen 3 हा प्रोसेसर उत्तम परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी बेस्ट आहे.

  • स्टोरेज दोन व्हेरिएंट्स आहेत 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज.

  • कॅमेरा बॅक 50MP मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स; सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा.

  • बॅटरी 5500mAh क्षमतेची दमदार बॅटरी, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. म्हणजे फक्त काही मिनिटांतच भरपूर चार्जिंग होते .

  • सॉफ्टवेअर Android 15 वर आधारित Funtouch OS ज्यात अनेक कस्टमायजेशन आणि स्मार्ट फीचर्सचा समावेश आहे.

Vivo T3 Pro सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वाधिक फिचर्सने भरलेल्या आणि स्टाईलिश स्मार्टफोन्सपैकी एक आहे. डिस्प्लेपासून प्रोसेसर आणि कॅमेरापर्यंत सगळ्याच बाबतीत हा फोन उत्तम आहे. मिड बजेटमध्ये फ्लॅगशिप अनुभव देणारा Vivo T3 Pro, सध्या मिळणाऱ्या डिस्काउंटमुळे जास्तच आकर्षक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

Chhatrapati Sambhajinagar News : विवाहाचे अमिष दाखवून संबंध! डिएनए अहवालातून स्पष्ट झालेल्या पित्याला जामिन

गावाकडे जात असताना प्रसिद्ध गायकावर अंदाधुंद गोळीबार; पाठलाग करत कारमधून हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, घटनेनंतर खळबळ

MP Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा फक्त माध्यमातच

SCROLL FOR NEXT