Vivo T4 Ultra Smartphone Launch Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Vivo T4 Ultra Launch : एकच झलक, सबसे अलग! 11 जूनला लाँच होतोय Vivo T4 Ultra; दमदार फीचर्स अन् किंमत पाहा एका क्लिकवर..

Vivo T4 Ultra Smartphone Launch Price Features : विवो T4 अल्ट्रा स्मार्टफोन ११ जून रोजी भारतात लाँच होतोय. याची किंमत आणि जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

Saisimran Ghashi

Vivo Mobile Launch : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. Vivo लवकरच आपल्या T4 सिरीजमधील तिसरा स्मार्टफोन Vivo T4 Ultra भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले आहे की हा नवा फोन ११ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन Flipkart वर उपलब्ध होणार असून, याची झलक Vivo ने आधीच दाखवली आहे.

आकर्षक फीचर्स

Vivo T4 Ultra मध्ये मिळणार आहेत अत्याधुनिक फीचर्स, जे तुम्हाला थक्क करतील. फोटोग्राफी प्रेमींसाठी ही खरी पर्वणीच ठरणार आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यात

  • 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा

  • 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर

  • 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर

हे कॅमेरे 3x पेरिस्कोप झूम, 10x टेलिफोटो मॅक्रो झूम, आणि 100x डिजिटल झूम अशी अत्याधुनिक झूम क्षमता देतात. सेल्फी प्रेमींसाठी यामध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो उत्तम फोटो अनुभव देईल.

बॅटरी

वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेता Vivo T4 Ultra मध्ये 7000mAh ची मोठ्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते, त्यामुळे फक्त काही मिनिटांत बॅटरी फुल होणार! सतत प्रवास करणाऱ्यांसाठी आणि गेमिंगप्रेमींसाठी ही एक आदर्श निवड ठरणार आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन

या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा कर्व्ह्ड OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस असेल. हे फोनला एक प्रीमियम लुक देते आणि कंटेंट पाहण्याचा अनुभव आणखी खुलतो.

प्रोसेसर व सॉफ्टवेअर

Vivo T4 Ultra मध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर देण्यात आला आहे, जो जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. फोन Android 15 वर चालणार आहे, त्यामुळे नवीनतम अपडेट्स आणि फिचर्सचा लाभ वापरकर्त्यांना मिळेल.

किंमत आणि स्पर्धा

याची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र अंदाजे ३५,००० रुपायांच्या आसपास किंमत असण्याची शक्यता आहे. ही किंमत पाहता Vivo T4 Ultra हा Samsung, Realme, IQ आणि इतर प्रीमियम ब्रँड्सच्या स्मार्टफोनना टक्कर देऊ शकतो.

सर्वांचे लक्ष लागलेल्या या फोनचा लॉंच इव्हेंट ११ जून रोजी दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. Vivo T4 Ultra Flipkart वरून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: मानाच्या गणेश मंडळांना बिर्याणी अन् इतरांना समोसे; पुणे पोलिस आयुक्तालयाचा प्रकार

Latest Maharashtra News Updates Live : २९ ऑगस्टला मुंबईला न येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडा – मनोज जरांगे पाटील

Solapur politics:'सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करणार'; प्रवेशासाठी अनेक नेते तयार, मुख्यमंत्र्यांसोबत १० दिवसांत बैठक

Rahul Gandhi: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिला फटकारा, किरेन रिजिजू म्हणाले आता तरी सुधारतील

Video : जन्मदाती रस्त्यावर मग वंशाचा दिवा कशाला हवा? रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी वृद्ध आई, काळीज पिळवटणारा व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT