Vivo X Fold 5 and Vivo X200 FE smartphone launch price features esakal
विज्ञान-तंत्र

एकच झलक, सबसे अलग! 'Vivo X Fold 5' अन् 'Vivo X200 FE' स्मार्टफोनची भारतात एन्ट्री; परवडणारी किंमत, दमदार फीचर्स एकदा बघाच..

Vivo X Fold 5 and Vivo X200 FE smartphone launch price features : विवो १४ जुलैला भारतात Vivo X Fold 5 आणि X200 FE हे दोन दमदार स्मार्टफोन सादर करत आहे. फोल्डेबल डिझाईन, झाइस कॅमेरा आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह हे फोन ग्राहकांचे लक्ष वेधणार आहेत

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • Vivo X Fold 5 हा अत्यंत हलका व स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे.

  • 6000mAh बॅटरी व 80W फास्ट चार्जिंगने तो दिवसभर कार्यक्षम राहतो.

  • Vivo X200 FE मध्ये प्रीमियम झाइस कॅमेरा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

विवो स्मार्टफोनप्रेमींना मोठी खुशखबर आहे. १४ जुलैला Vivo आपल्या दोन बहुप्रतीक्षित स्मार्टफोनचे लाँचिंग भारतात करत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा फोल्डेबल फोन Vivo X Fold 5 आणि उच्च दर्जाच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेला Vivo X200 FE हे दोन मॉडेल्स आहेत. भारतात हे दोन्ही फोन दुपारी १२ वाजता अधिकृतपणे सादर केले गेले.

Vivo X Fold 5

Vivo X Fold 5 हा आतापर्यंतच्या सर्वात स्लिम आणि हलक्या फोल्डेबल फोनपैकी एक आहे. फक्त २१७ ग्रॅम वजन, आणि फोल्ड केल्यावर ०.९२ सेंटीमीटर तर पूर्णपणे ओपन केल्यावर ०.४३ सेंटीमीटर इतकीच त्याची जाडी आहे. त्यामुळे तो सहज खिशात मावणारा आणि आरामात बाळगता येणारा हँडसेट आहे.

डिझाइन हायलाइट्स-

  • अल्ट्रा थिन आणि हलकी बॉडी

  • प्रीमियम लूक व हँडग्रिप

  • ट्रॅव्हल आणि बिझनेस वापरासाठी परिपूर्ण

बॅटरी आणि चार्जिंग

Vivo X Fold 5 मध्ये देण्यात आली आहे 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, जी दिवसभराचा वापर सहज सांभाळते. या फोल्डेबल हँडसेटमध्ये 80W फ्लॅश चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच कमी वेळात भरपूर चार्जिंग मिळणार आहे

Vivo X200 FE

Vivo X Fold 5 बरोबरच कंपनी आणखी एक आकर्षक हँडसेट सादर करणार आहे . Vivo X200 FE. हा फोन खास करून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रेमींसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये ZEISS कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, उत्कृष्ट इमेज प्रोसेसिंग अनुभव मिळणार आहे.

कॅमेरा फीचर्स

  • ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

  • प्रोफेशनल ग्रेड फोटो व व्हिडिओ गुणवत्ता

  • ZEISS ऑप्टिक्स सपोर्ट

हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल

  • लक्स ग्रे

  • अॅम्बर येलो

  • फ्रॉस्ट ब्लू

लाँच कधी आणि कुठे?

Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE हे दोन्ही स्मार्टफोन १४ जुलैला अधिकृतपणे भारतात लाँच झाले आहेत. याचे टीझर Vivo च्या अधिकृत पोर्टलवर आधीच पाहायला मिळत आहेत आणि अनेक फीचर्सची पुष्टी झाली आहे.

किंमत आणि विक्री

जरी किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, तरी या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता ते प्रीमियम सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

FAQs

1. विवो X Fold 5 कधी लॉन्च होतो आहे?
१४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भारतात लॉन्च झाला आहे.

2. या फोनची खास फीचर्स कोणती आहेत?
अत्यंत स्लिम डिझाईन, 6000mAh बॅटरी, 80W चार्जिंग आणि फोल्डेबल स्क्रीन.

3. Vivo X200 FE मध्ये कॅमेरा कसा आहे?
यात ZEISS टेक्नोलॉजीसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

4. Vivo X Fold 5 चा Samsung Z Fold 7 शी मुकाबला होईल का?
होय, या दोन्ही प्रीमियम फोल्डेबल फोनमध्ये थेट स्पर्धा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT