Vivo X100 Series
Vivo X100 Series eSakal
विज्ञान-तंत्र

Vivo X100 Series : अखेर भारतात लाँच झाली व्हिवोची नवी स्मार्टफोन सीरीज! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Sudesh

व्हिवोची बहुप्रतिक्षित X100 स्मार्टफोन सीरीज अखेर भारतात लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने Vivo X100 आणि Vivo X100 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही फोनपैकी प्रो व्हर्जनच्या कॅमेऱ्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

या स्मार्टफोनच्या प्रो व्हर्जनमध्ये 50MP क्षमतेचे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी लाँच होणाऱ्या बेस्ट कॅमेरा स्मार्टफोनच्या यादीत आतापासूनच व्हिवोने आपलं स्थान निश्चित केलं आहे. या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 50MP+64MP+15MP असे तीन कॅमेरे मिळतात. सेल्फीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

फीचर्स

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 चिपसेट देण्यात आली आहे. हा प्रोसेसर TSMC थर्ड जनरेशन 4nm वर आधारित आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी कमी खर्च होते, आणि परफॉर्मन्स फास्ट होतो.

या दोन्ही फोनमध्ये 6.78 इंच मोठा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची पीक ब्राईटनेस 3000 निट्स आहे. तसंच याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर टॉप मॉडेलमध्ये 5,400 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

स्टोरेज अन् किंमत

या फोनच्या बेस मॉडेलचे (Vivo X100) दोन स्टोरेज व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 63,999 रुपये आहे. 16GB+512GB व्हेरियंटची किंमत 69,999 रुपये आहे. Vivo X100 Pro या स्मार्टफोनचा एकच व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 16GB+512GB हा ऑप्शन आहे. याची किंमत 89,999 रुपये आहे.

व्हिवोचे हे स्मार्टफोन 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. याचं प्री-बुकिंग आजपासून सुरू करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT