Vivo Y30 5G google
विज्ञान-तंत्र

जबरदस्त selfie कॅमेरा घेऊन येत आहे Vivo Y30 5G

हँडसेटमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

नमिता धुरी

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo ने नुकताच Y77 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे, जो 6.58-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. Vivo कंपनी लवकरच एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन स्मार्टफोन Vivo Y30 5G नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Pricebaba च्या ताज्या रिपोर्टनुसार, Vivo Y30 5G स्मार्टफोन बजेट स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. Vivo Y30 5G मध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट समाविष्ट केला जाऊ शकतो. याशिवाय, हँडसेटमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये HD+ स्क्रीन रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 6.51-इंच एलसीडी डिस्प्ले अपेक्षित आहे.

डिव्हाईसमध्ये फोटोग्राफीसाठी डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर दिसू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो. Vivo कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

Chhagan Bhujbal : येवल्यातील कांदाप्रक्रिया उद्योगाला चालना; चिंचोडी एमआयडीसी मध्ये ५० एकरवर उभारणार प्रकल्प- मंत्री छगन भुजबळ

Latest Marathi News Live Update : मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

Latur News : गाव अन् आडनाव एकच, कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; तरुण-तरुणीनं थेट मृत्यूला कवटाळलं

Thane News: परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतीत! भातकापणीवर परिणाम होण्याची भीती; उत्पन्नावरही फटका बसणार

SCROLL FOR NEXT