Sunita Williams Space Dance Video esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Video : सुनिता विलियम्स अन् डॉन पेटिटचा 'स्पेस रोमँटिक डान्स' व्हिडिओ तुफान व्हायरल, तुम्हीपण एकदा बघाच

Sunita Williams Space Dance Video : सुनिता विलियम्स आणि डॉन पेटिट यांचा ISS मधील शून्य गुरुत्वाकर्षनात दिलखुलास नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या सुंदर क्षणाने हजारो अंतराळप्रेमींची मने जिंकली आहेत.

Saisimran Ghashi

Sunita Williams Dance Video : अंतराळातली धडकी भरवणारी मोहिम, तांत्रिक अडचणी, हजारो किलोमीटर दूर पृथ्वीपासूनची एकाकी जीवनशैली हे सगळं असूनही नासाचे अनुभवी अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि डॉन पेटिट यांनी एक सुंदर आणि आनंददायक क्षण जगासमोर आणला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघंही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये विलियम्स आणि पेटिट ISS च्या मॉड्यूल्समधून अलगद तरंगत, आनंदाने फिरत आणि नाचत आहेत. त्यांच्या हालचालींमध्ये सहजता आणि आनंद स्पष्ट दिसतो. या व्हिडिओने जागतिक अंतराळप्रेमींना केवळ मिशनच्या गंभीरतेचा नव्हे तर त्यातील हलक्याफुलक्या क्षणांचा देखील प्रत्यय दिला आहे.

सुनिता विलियम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर असून त्यांनी आतापर्यंत तीन अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या आहेत. दरवेळी ISS मध्ये प्रवेश करताना त्या एका छोट्याशा डान्सद्वारे मोहिमेची सुरुवात करत असल्याचं अनेक व्हिडिओजमधून दिसून आलं आहे. ही सवय त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील लोकप्रिय झाली आहे.

डॉन पेटिट हे देखील NASA चे अनुभवी अंतराळवीर असून त्यांनी त्यांच्या विज्ञानातील योगदानासोबतच मोहिमेतील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने सहकाऱ्यांचं मनोबल कायम उंच ठेवलं.

हा छोटासा डान्स केवळ मनोरंजन नसून अंतराळात दीर्घ काळासाठी असलेल्या मिशनमध्ये मानसिक आरोग्य आणि मनोबल जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. विलियम्स आणि पेटिट यांचं हे हलकंफुलकं वर्तन सहकाऱ्यांना सकारात्मक ठेवतं आणि पृथ्वीवरील प्रेक्षकांना देखील प्रेरणा देतो.

सुनिता विलियम्स नुकत्याच पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांचे ही मिशन साधारण नऊ महिन्यांचे होते. जे मूळ नियोजनाच्या तुलनेत बरेच जास्त होतं. Starliner अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन लांबणीवर पडले फेब्रुवारी मध्ये सुनीता पृथ्वीवर परतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : युद्धाची परिभाषा आता बदलू लागली आहे- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT