Vehicle Sakal
विज्ञान-तंत्र

Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

गाडीत इंधन भरताना आपण विशेष काळजी घेतो. मात्र, चुकीने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? ही छोटी वाटणारी चूक तुम्हाला महागात पडू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Wrong Fuel In Bike: सध्या कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात डिझेल, पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्या पाहायला मिळतात. गाडीत इंधन भरताना आपण विशेष काळजी घेतो. परंतु, चुकीने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? ही छोटी वाटणारी चूक तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे तुमच्या गाडीचे तर नुकसान होईलच, मात्र तुम्हाला आर्थिक फटका देखील बसेल. अशी चूक झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. अशा स्थितीत काय करायला हवे, ते जाणून घेऊया.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सर्वात आधी करा हे काम

तुमच्या बाईक अथवा कारमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल भरल्यास सर्वात प्रथम फ्यूल टँक खाली करा. टँकच्या एकूण क्षमतेच्या ५ टक्के अथवा त्यापेक्षा कमी डिझेल भरल्यास कोणतीही समस्या येणार नाही. तुम्ही पेट्रोल भरून वाहन सहज चालवू शकता. मात्र, फ्यूल टँक खाली करणे कधीही फायद्याचे ठरेल.

गाडी सुरू करू नका

चुकीचे इंधन भरल्यास सर्वात प्रथम फ्यूल टँक खाली करा. अशी चूक झाल्यास कधीही गाडी स्टार्ट करू नये. गाडी स्टार्ट न करता सर्व्हिस सेंटरला घेऊन जा. अशा स्थितीमध्ये गाडी स्टार्ट केल्यास इंधन इंजिनपर्यंत पोहचेल व यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

टँक फ्लॅश करा

सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन गेल्यावर फ्यूल टँक रिकामा केला जातो. मात्र, यानंतरही टँकला फ्लश करणे फायद्याचे करेल. तसेच, इंधनचे फिल्टर देखील बदला. अशाप्रकारे, तुम्ही गाडीचे नुकसान टाळू शकता.

हेही वाचा: iPhone Offer: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! लेटेस्ट मॉडेल चक्क निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT