WhatsApp Channels eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Channels : व्हॉट्सअ‍ॅपचं 'चॅनल्स' फीचर आता जगभरात उपलब्ध; भारतासह 150 देशांमध्ये लाँच

Channels Feature : सुरुवातीला भारतात इंडियन क्रिकेट टीम, कॅटरीना कैफ, दिलजीत दोसांझ, अक्षय कुमार, विजय देवेरकोंडा आणि नेहा कक्कर असे चॅनल्स असणार आहेत.

Sudesh

WhatsApp new Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपलं चॅनल्स फीचर हे जगभरातील 150 देशांमध्ये लाँच केलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. ही प्रक्रिया 13 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली असून, येत्या काही आठवड्यांमध्ये हे सर्वत्र उपलब्ध होईल असं कंपनीने स्पष्ट केलं.

सुरुवातीला भारतात इंडियन क्रिकेट टीम, कॅटरीना कैफ, दिलजीत दोसांझ, अक्षय कुमार, विजय देवेरकोंडा आणि नेहा कक्कर असे चॅनल्स असणार आहेत. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचं आणि मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचेही वेगवेगळे चॅनल्स असणार आहेत.

काय आहे हे फीचर?

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरमुळे आता यूजर्स स्वतःचं ब्रॉडकास्ट चॅनल सुरू करू शकणार आहेत. हे चॅनल व्हॉट्सअ‍ॅपमध्येच असणार आहे. यासाठी दुसरं कोणतं अ‍ॅप घेण्याची गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या या फायदा कॉलेज, संस्था, क्लासेस आणि कंपन्यांना होणार आहे.

यूजर्स आपल्या आवडीच्या विषयांबाबत असणारे दुसरे चॅनल्स फॉलो देखील करू शकणार आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला भारतीय क्रिकेट टीमबद्दल अपडेट्स हवे असल्यास, तो चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये ते चॅनल चालवणारा अ‍ॅडमिन नियमित अपडेट देत राहील.

'अपडेट' टॅब

चॅनल्स फीचरसाठी व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस हे टॅब बदलून त्याजागी 'अपडेट्स' नावाची टॅब येईल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे स्टेटस आणि तुम्ही फॉलो करत असलेले चॅनल्स दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT