WhatsApp delete for everyone feature  
विज्ञान-तंत्र

व्हॉट्सॲप मेसेज दोन दिवसांनंतरही करता येईल डिलीट, येतंय नवीन फीचर

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp delete for everyone feature : व्हॉट्सॲप आता एका नवीन अपडेटवर काम करत आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन दिवसांनंतरही चॅटमध्ये पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे . रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप 'डिलीट फॉर एव्हरीवन' (Delete for Everyone) या फीचरची टाइमलाइन दोन दिवस आणि 12 तासांनी वाढवण्यावर काम करत आहे. म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर दोन दिवसांनी युजर्स आता त्यांचे मेसेज डिलीट करू शकतील.

सध्या, Delete for Everyone हे फीचर फक्त एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंदांसाठी आहे. याचा फायदा असा होईल की, लोक चुकून पाठवलेला मेसेज प्रत्येकासाठी बराच वेळ होऊन गेल्यावरही डिलीट करू शकतील.

WhatsApp बीटा ट्रॅकर WABetaInfo ने नवीन फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp च्या Android आवृत्ती 2.22.410 वर डिलीट फॉर एव्हरीवन फीचरची नवीन वेळ मर्यादा टेस्टिंग केली जात आहे. नवीन अपडेटनंतर प्रत्येकासाठी व्हॉट्सॲपचे मेसेज डिलीट करण्यासाठी अडीच दिवसांचा अवधी असेल.

याआधी देखील असा दावा करण्यात आला होता की, व्हॉट्सॲप नवीन अपडेटवर काम करत आहे, त्यानंतर सात दिवसांनंतरही व्हॉट्सॲप मेसेज प्रत्येकासाठी डिलीट केले जाऊ शकतील, जरी हे अपडेट प्रत्येकासाठी किती कालावधीत जारी केले जाईल, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

व्हॉट्सॲप एक कम्युनिटी फीचरचीही टेस्टींग करत आहे, जे एका काही ग्रुप्सचा ग्रुप प्रमाणेच असेल आणि या कम्युनिटीचा एक ॲडमिनही असेल. जो ही कम्युनिटी मॉडरेट करेल. जर एखाद्या ग्रुप मेंबरने ग्रुप सोडला, तर तो त्या कम्युनिटीशी जोडलेले इतर ग्रुप देखील पाहू शकणार नाही.

व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने सर्वप्रथम या फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, वापरकर्ते त्यांच्या कम्युनिटीला नाव देखील देऊ शकतील. याशिवाय, कम्युनिटीचे अॅडमिन देखील त्यांच्या स्वतःच्या ग्रुपचे डिस्क्रिप्शन देखील हवे तसे देऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT