WhatsApp Deta Hack : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप आज जगभरातील लाखो यूजर्स वापरत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व्हॉटसअॅपचा डेटा चोरीला गेला आहे. या बातमीमुळे जगभरातील करोडो लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. एका अंदाजानुसार व्हॉट्सअॅपच्या ५०० कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेला असून, यात अमेरिकेसह जगातील ८४ देशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
व्हॉट्सअॅपच्या इतिहासातील हा सर्वात मोठी डेटा हॅकिंग असल्याचे मानले जात असून, हॅकर्सने जगभरातील करोडो यूजर्सचे फोन नंबर आणि इतर माहिती चोरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे हा चोरलेला हा सर्व डेटा हॅकर्सच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हॅकर्सने चोरलेल्या या डेटामुळे आगामी काळात बँक फसवणुकीसह अनेक प्रकारचे घोटाळे होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोणत्या देशातील नागरिकांचा लीक झाला डेटा?
व्हॉट्सअॅप आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये वापरले जाते. समोर आलेल्या माहितीनुसार जगातील ८४ देशांमध्ये डेटा चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. डेटा चोरीला गेलेल्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, इजिप्त, इटली, सौदी अरेबिया आणि भारत या देशांचा समावेश आहे. या देशांतील सुमारे ५०० कोटी व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा लीक झाला आहे.
सर्वाधिक जास्त डेटा चोरी ही अमेरिकन यूजर्सची असून, येथील ३२ मिलियन यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. त्याच वेळी इजिप्तच्या ४५ लाख, इटलीचे ३५ लाख, सौदी अरेबियाचे २९ लाख, फ्रान्सचे २० लाख, तुर्कीचे २० लाख, रशिया १० लाख, ब्रिटनच्या ११ लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे.
चोरलेला डेटा विक्रीसाठी उपलब्ध
सायबरन्यूजच्या रिपोर्टनुसार, हॅकिंग कम्युनिटी फोरमवर चोरलेला व्हॉट्सअॅप डेटा विक्रीचा दावा करणारी पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात असा दावा केला जात आहे की, ४८७ लाख व्हाट्सअॅप मोबाईल यूजर्सचा डेटाबेस विकला जात आहे. चोरलेला हा डेटा सायबर हल्लेखोर विकत घेऊ शकतात. त्यामुळे अनेकांची बँकिंग आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे हॅकर्सच्या टार्गेटवर येऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.