Whatsapp Tracking Secret Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपवर कोण तुम्हाला ट्रॅक करतंय माहितीये? या सिक्रेट ट्रिकने मिनिटात कळेल नाव, पटकन बघून घ्या सेटिंग

Whatsapp Tracking Secret Feature : व्हॉट्सअ‍ॅपच्या सिक्रेट वैशिष्ट्यामुळे तुम्ही कोण तुमचे स्थान ट्रॅक करत आहे हे सहज शोधू शकता. स्थान शेअरिंगची तपासणी करून तुमची गोपनीयता सुरक्षित करा.

Saisimran Ghashi

WhatsApp Secret Features : व्हॉट्सअ‍ॅप ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन आहे. चॅटिंग, व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाइन पेमेंट्स, दस्तऐवज शेअरिंग यांसारख्या सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अ‍ॅपने नेहमीच वापरकर्त्यांच्या सोयीसाठी नवनवीन अपडेट्स आणले आहेत. सध्या WhatsApp ने एक अत्यंत उपयुक्त फीचर उपलब्ध करून दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता की, तुमचं लोकेशन कोण ट्रॅक करतंय.

व्हॉट्सअ‍ॅपच्या सेफ्टी फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीपासूनच गोपनीयतेला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे 3.5 अब्जांहून अधिक लोक या अ‍ॅपवर विश्वास ठेवतात. त्यातील एका खास सुविधेमुळे तुम्हाला थेट तुमचं लोकेशन शेअर करता येतं. पण ही सुविधा जशी उपयुक्त आहे, तशी ती चुकीच्या पद्धतीने वापरली गेल्यास खूप धोकादायक ठरू शकते.

लोकेशन शेअरिंगचा धोका कसा कमी कराल?

समजा, कोणी व्यक्ती तुमच्याशी भेटण्यासाठी येत असताना त्याला तुमच्या नेमक्या ठिकाणाची माहिती हवी असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत तुमचं लाइव्ह लोकेशन शेअर करता. पण, जर हे लोकेशन वेळेवर बंद करायचं विसरलात, तर ते व्यक्ती तुमचं लोकेशन सतत ट्रॅक करू शकतो. त्यामुळे गोपनीयतेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

कोण तुमचं लोकेशन ट्रॅक करतंय, हे कसं तपासाल?

सुदैवाने, WhatsApp ने अशा प्रसंगांसाठी एक सोयीस्कर फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाशी तुमचं लोकेशन शेअर केलंय हे तपासू शकता आणि गरज असल्यास ते बंद करू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1. WhatsApp उघडा.

2. उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांच्या मेन्यू आयकॉन वर टॅप करा.

3. Settings या पर्यायावर क्लिक करा आणि Privacy टॅब निवडा.

4. खाली स्क्रोल करून Location पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

5. तुम्ही ज्यांच्यासोबत तुमचं लाइव्ह लोकेशन शेअर केलंय, त्यांची यादी इथे दिसेल.

6. इथून तुम्ही लोकेशन शेअरिंग थांबवू शकता.

ही सुविधा तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे WhatsApp च्या या फीचरचा योग्य वापर करा आणि तुमच्या लोकेशनबाबत अधिक सावध राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT