whatsapp video call background change customization feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका गेमचेंजर फीचरची एंट्री! नवीन अपडेट पाहा एका क्लिकमध्ये...

whatsapp video call new feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर व्हिडिओ कॉलिंग संबंधित आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp New Update Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी नवनवीन फीचर्स आणत युजर्सचा अनुभव अधिक इंटरॅक्टिव्ह आणि मजेशीर बनवला आहे. जगभरातील 3 अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या कॉलिंग सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. आता ग्रुप कॉलिंगपासून डेस्कटॉप कॉलिंगपर्यंत अनेक सुविधा अधिक सुलभ आणि आकर्षक झाल्या आहेत.

नवीन फीचर्स

1. सेलेक्टिव्ह ग्रुप कॉलिंग

ग्रुप चॅटमधून कॉल करताना आता तुम्ही संपूर्ण ग्रुपऐवजी फक्त काही निवडक व्यक्तींना कॉल करू शकता. यामुळे गरजेनुसार संवाद साधणं अधिक सुलभ होईल.

2. व्हिडिओ कॉलमध्ये मजेशीर इफेक्ट्स

व्हिडिओ कॉलिंग अधिक इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी Snapchatसारखे मजेशीर इफेक्ट्स आणि पार्श्वभूमी बदलण्याचे पर्याय व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी उपलब्ध केले आहेत.

3. डेस्कटॉप कॉलिंग अधिक सोपे

डेस्कटॉपवरून कॉल करणं आता अधिक सोपं झालं आहे. लॉगिन केल्यानंतर थेट कॉल सुरू करण्याचा, कॉल लिंक तयार करण्याचा किंवा नंबर डायल करण्याचा पर्याय युजर्सना दिसेल.

Android आणि iOS युजर्स

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या अपडेट्समुळे अॅप वापरणं अधिक सोपं आणि आनंददायक होणार आहे. Meta कंपनीच्या मालकीच्या या अॅपने युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन सतत सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे WhatsApp आज जगातील अग्रगण्य मेसेजिंग अॅप बनले आहे.

सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यासाठी Elon Musk यांची Starlink सेवा भारतात लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सॅटेलाइट इंटरनेट सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम वाटप प्रक्रियेची माहिती जाहीर केली. लवकरच Starlink आणि इतर सेवा देशभरातील दुर्गम भागातही इंटरनेट सुविधा पोहोचवतील.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेट्सबरोबरच भारताच्या डिजिटल क्रांतीतही मोठी भर पडत आहे, ज्यामुळे युजर्ससाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT