WhatsApp to introduce logout option esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp new feature : अकाउंट डिलिट नाही, आता फक्त लॉगआउट! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं एकदा बघाच

WhatsApp to introduce logout option : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच वापरकर्त्यांना अकाउंट डिलिट न करता लॉगआउट होण्याची सुविधा देणार आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp new update : जगातील सर्वात मोठा इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आता वापरकर्त्यांसाठी एक नवीन बदल घेऊन येत आहे. 3.5 अब्जांहून अधिक वापरकर्त्यांचा आधार असलेला WhatsApp वापरकर्त्यांच्या अनुभवात सातत्याने सुधारणा करत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फिचर विकसित करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांचं अकाउंट डिलीट न करता लॉगआउट होण्याची सुविधा देणार आहे.

अकाउंट डिलीट न करता ‘Logout’ होण्याची सुविधा

सध्या वापरकर्त्यांकडे अकाउंट डिलीट करण्याचा एकमेव पर्याय असतो आणि त्यामुळे सर्व डेटा डिलीट होतो. पण नव्या फीचरसह वापरकर्ते आता थेट लॉगआउट होऊ शकणार आहेत, तेही डेटा न गमावता!

Logout फिचर कसे वापरायचे?

Android Authority आणि AssembleDebug ने WhatsApp च्या Android बीटा एडिशनने हे फिचर शोधून काढले आहे. हे Settings > Account या सेक्शनमध्ये दिसून येईल आणि वापरकर्त्यांना तीन पर्याय मिळतील

  1. Erase all Data and Preferences – सर्व डेटा आणि सेटिंग्ज डिलिट होतील.

  2. Keep all Data and Preferences – लॉगआउट होईल पण सर्व डेटा जसेच्या तसे राहील.

  3. Cancel – लॉगआउट प्रक्रिया रद्द केली जाईल.

जर वापरकर्ता दुसरा पर्याय निवडतो, तर तो लॉगआउट झाल्यानंतरही त्याचे मेसेज, फाईल्स आणि मीडिया फोनमध्येच राहतील. पुन्हा लॉगिन केल्यावर ते सहज वापरता येतील.

कशासाठी उपयुक्त ठरेल हे फिचर?

  • काही काळासाठी व्हॉट्सअ‍ॅप पासून ब्रेक घेणाऱ्यांसाठी

  • एकाच डिव्हाईसवर दुसऱ्या अकाउंटने लॉगिन करायचं असल्यास

  • अकाउंट डिलिट न करता सॉफ्ट लॉगआउटची सुविधा हवी असेल तेव्हा

iPad वापरकर्त्यांसाठीही खुशखबर

Meta कंपनीने अखेर iPad वापरकर्त्यांसाठी अधिकृत WhatsApp अ‍ॅप रिलीज केलं आहे. त्यामुळे आता iPad च्या मोठ्या स्क्रीनवरही सहज आणि पूर्ण मेसेजिंग अनुभव मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपकडून येणाऱ्या या नव्या लॉगआउट फिचरमुळे वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकाउंट डिलिट न करता लॉगआउट होण्याची मुभा मिळाल्याने डेटा सुरक्षित ठेवता येणार आहे. विशेषतः प्रायव्हसी किंवा डिजिटल ब्रेक हवे असणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : दादरमध्ये उज्ज्वल निकम यांचा सत्कार समारंभ

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT